विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गुजरातमधील १० निनावी पक्षांना ५ वर्षांत ४३०० कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. राहुल गांधी यांनी यावरुन भाजप आणि निवडणूक आयाेगावर टीका केली आहे. हे हजारो कोटी कुठून आले? या पक्षांना कोण चालवत आहे? असा सवाल काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
दैनिक भास्करच्या एका वृत्ताचा हवाला देत, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, गुजरातमध्ये काही निनावी पक्ष आहेत, ज्यांची कोणी नावेही ऐकली नाहीत. पण, या पक्षांना ४३०० कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. या पक्षांनी फार कमी वेळा निवडणुका लढवल्या किंवा त्यावर खर्च केला आहे. हे हजारो कोटी कुठून आले? या पक्षांना कोण चालवत आहे? आणि पैसे गेले कुठे? निवडणूक आयोग याची चौकशी करेल, की येथेही प्रतिज्ञापत्र मागेल? की स्वतः कायदा बदलून डेटा लपवतील?”निवडणूक आयोगावर मत चोरीचे आरोप गेल्या २ महिन्यांपासून राहुल गांधी निवडणूक आयोगावर सातत्याने टीका करत आहेत. यासोबतच निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत असल्याची टीकाही त्यांनी करत आहेत. आगामी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या त्यांनी मतदार हक्क यात्रा काढली आहे. मुझफ्फरनगरमध्ये सभेत बाेलताना राहुल गांधी म्हणाले की, प्रत्येक वेळी असे होते की, प्रथम ओपिनियन पोल येतात तेव्हा काँग्रेस जिंकत असल्याचे दिसून येते, परंतु निकालात भाजप जिंकते. २०१४ च्या आधी गुजरातमधून मत चोरीची प्रक्रिया सुरू झाली. गुजरात मॉडेल हे हिट मॉडेल नाही, तर गुजरात मॉडेल हे मत चोरीचे मॉडेल आहे.
निवडणूक आयाेगावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, गरीबांची मते कापली जात आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा आणि लोकसभेतही मत चोरी झाली. आम्ही कर्नाटकात आमच्या टीम तैनात केल्या आणि भाजपची मत चोरी समोर आणली. आम्ही भविष्यातही त्यांच्या चोरीचे पुरावे सादर करू. संविधानात लिहिले आहे की, एका व्यक्तीला एका मताचा अधिकार आहे, परंतु भाजप यावर हल्ला करत आहे. बिहारमध्ये ज्यांची मते कापली गेली, ते मागास, दलित आणि अल्पसंख्याक होते. भारतातील गरिबांची मते कापली जात आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शाह मते चोरतात आणि नंतर निवडणुका जिंकतात. निवडणूक आयोग या लोकांना मदत करत आहे.
Donations of Rs 4300 crore to 10 anonymous parties in Gujarat in 5 years, Rahul Gandhi targets BJP and Election Commission
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला