विशेष प्रतिनिधी
कोलकाता : बॉलीवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या आगामी चित्रपट द बंगाल फाईल्सच्या शांततापूर्ण प्रदर्शानासाठी थेट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आवाहन केले आहे. हा चित्रपट 5 सप्टेंबर 2025 रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. मात्र तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नोंदवलेल्या विरोधामुळे बंगालमध्ये अनौपचारिक बंदी येऊ शकते, अशी भीती अग्निहोत्रींनी व्यक्त केली आहे. Mamata Banerjee
2 सप्टेंबर रोजी त्यांनी सोशल मीडियावरून एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध करत बॅनर्जी यांना थेट संबोधित केले आहे. “चित्रपटगृहांचे मालक प्रचंड राजकीय दबावाखाली आहेत. अधिकृत बंदी नसली तरी चित्रपट दाखवल्यास मोठी किंमत मोजावी लागेल, अशी भीती त्यांना वाटते. तुमच्या पक्षातील कार्यकर्ते या चित्रपटावर बंदीची मागणी करत आहेत. त्यामुळे कृपया तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन बंगालमध्ये शांततापूर्ण प्रदर्शन व्हावे यासाठी करावे,” असे ते म्हणाले.
अग्निहोत्रीं म्हणाले की द बंगाल फाईल्सला केंद्रीय चित्रपट सेन्सॉर मंडळाने (CBFC) प्रमाणपत्र दिले आहे. “तुम्ही प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचे व स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची शपथ घेतली आहे. CBFC ही घटनात्मक संस्था आहे. त्यांनी चित्रपटाला परवानगी दिल्यानंतर राज्याने त्याच्या प्रदर्शनात अडथळा आणू नये, ही तुमची जबाबदारी आहे.
बंगालच्या भूतकाळाचा उल्लेख करताना अग्निहोत्री म्हणाले, हे राज्य हिंदू नरसंहाराला विसरले आहे. बंगाल हे असे एकमेव राज्य आहे ज्याचे दोनदा विभाजन झाले, 1905 आणि 1947 मध्ये. इतके बलिदान इतर कोणी दिलेले नाही. पण आजची पिढी याबद्दल काही जाणते का? जर तुम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार केला तर तुम्ही या चित्रपटाला बंदी घालणार नाही, उलट त्याला सलाम कराल.”
द बंगाल फाईल्स कोणत्याही समुदायाविरोधात नसून अग्निहोत्री म्हणाले, हा चित्रपट द्वेष पसरवण्यासाठी नाही, तर इतिहास मान्य करण्यासाठी आहे. जर तुम्ही त्यावर बंदी घातली तर त्या नरसंहारग्रस्त आत्म्यांवरच बंदी घालाल. जर आपण डायरेक्ट अॅक्शन डे आणि नोआखलीची कथा आज सांगितली नाही, तर केव्हा सांगणार? जर हिंदू नरसंहाराची सत्यकथा सांगणे हा गुन्हा असेल, तर मी तो गुन्हेगार आहे. मग मला शिक्षा करा.
द बंगाल फाईल्समध्ये मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, अनुपम खेर, सिम्रत कौर आणि दर्शन कुमार यांची प्रमुख भूमिका आहेत.
Don’t ban the truth, Vivek Agnihotri’s open request to Mamata Banerjee for peaceful screening of ‘The Bengal Files
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांनी आम्हाला ज्ञान शिकवू नये, राधाकृष्ण विखे पाटील यांचा टोला
- शरद पवार भेटीला पोचणार म्हटल्याबरोबर मनोज जरांगे ताठ; उर्मट भाषेत फडणवीसांच्या पाठोपाठ राज ठाकरेंवर निशाणा!!
- मनोज जरांगे प्रमाणिक, पण त्याचा वापर, रोहित पवारांकडून रसद, नितेश राणे यांचा आरोप
- स्वतःचं पोरगं निवडणुकीत पाडलं, कधीपर्यंत भाजपची री ओढणार? मनाेज जरांगे यांचा राज ठाकरेंना सवाल