विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : Imran Khan पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्यावरील तुरुंगातील कथित बलात्काराच्या अफवांनी सोशल मीडियावर मोठा गोंधळ निर्माण केला आहे. मात्र या वृत्तामागे कोणतेही सत्य नाही. बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र व्हायरल झालाअसल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानी सरकार, वैद्यकीय संस्थांनी आणि पत्रकारांनी या बातमीचं पूर्णपणे खंडन केलं आहे.Imran Khan
इंटरनेटवर एक बनावट मेडिकल रिपोर्ट व्हायरल झाला होता. त्यामध्ये दावा करण्यात आला की इम्रान खान यांच्यावर तुरुंगात बलात्कार झाला असून, त्यांची वैद्यकीय तपासणी रावळपिंडीतील ‘पाक एमिरेट्स मिलिटरी हॉस्पिटल’मध्ये करण्यात आली होती. या रिपोर्टमध्ये इम्रान खान यांच्या शरीरावर लैंगिक अत्याचाराचे पुरावे असल्याचा दावा करण्यात आला होता.
संबंधित रुग्णालय व PIMS (Pakistan Institute of Medical Sciences) या अधिकृत संस्थांनी स्पष्ट केलं आहे की इम्रान खान यांची अशी कोणतीही वैद्यकीय तपासणी त्यांच्या रुग्णालयात करण्यात आलेली नाही. पाकिस्तान सरकारच्या माहिती विभागाने ही माहिती पूर्णपणे खोटी असल्याचं सांगितलं आहे. तसेच संबंधित डॉक्युमेंट फोटोंशॉप किंवा एआयद्वारे बनवले गेले असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. अनेक स्वतंत्र फॅक्ट-चेक संस्थांनीही तपासणी करून या वृत्ताचे खंडन केले. ते डॉक्युमेंट बनावट असल्याचं त्यांनी ठामपणे म्हटलं आहे.
इम्रान खान सध्या अल-कादिर ट्रस्ट घोटाळा आणि तुशाखाना प्रकरणात शिक्षा भोगत आहेत. तुरुंगात असताना त्यांनी तुरुंग प्रशासनावर मानसिक छळाचा आरोप केला आहे. त्यांनी लिहिलेल्या एका पत्रात अन्नावर शंका, भेटीगाठींवरील निर्बंध आणि मूलभूत अधिकार नाकारल्याचा उल्लेख आहे, मात्र बलात्कारासारख्या गंभीर घटनेचा कुठेही उल्लेख नाही. विश्लेषकांच्या मते, ही अफवा पसरवण्यामागे दोन हेतू असू शकतात. एकतर इम्रान खान यांच्यावरील सहानुभूती निर्माण करणे किंवा दुसऱ्या बाजूने पाकिस्तान सरकारला बदनाम करणे. मात्रइम्रान खान यांच्यावर तुरुंगात बलात्कार झाल्याचा दावा पूर्णपणे खोटा आणि निराधार आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेलं वैद्यकीय प्रमाणपत्र बनावट असून, त्याचा खरा घटनांशी काहीही संबंध नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Former Pakistan Prime Minister Imran Khan was raped in prison? What is the case?
महत्वाच्या बातम्या
- Pakistan पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची मोठी कारवाई; पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर बंदी
- Neelam Gorhe : पालघरमध्ये उपचाराअभावी मातेसह नवजात बालकाचा मृत्यू, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आरोग्य संचालकांना चौकशीचे निर्देश
- Sonu Nigam : सोनू निगमवर गुन्हा दाखल, कन्नडमध्ये गाणे गायचा आग्रह अन् म्हणाला यामुळेच पहलगाममध्ये युद्ध झालं…
- Ajit Pawar : तर अजित पवार, एकनाथ शिंदे हाेऊ शकतात मुख्यमंत्री… संजय राऊत यांचा दावा