विशेष प्रतिनिधी
पुणे : Godhra गुजरातमधील २००२ मध्ये झालेल्या कारसेवकांच्या गोध्रा रेल्वे हत्याकांडामधील आरोपीने पुण्यात येऊन चोऱ्या करण्यासाठी टोळी बनविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांने त्याला अटक केली आहे. हत्याकांड प्रकरणात ‘पॅरोल’वर कारागृहाबाहेर आलेला होता. तेव्हापासून तो पुन्हा कारागृहात परतलाच नव्हता. त्यानंतर त्याने, गुन्हेगारी टोळी तयार करून चोऱ्या सुरू केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. Godhra
सलीम उर्फ सलमान युसुफ जर्दा (वय ५५), साहील हनीफ पठाण (वय २१), सुफीयान सिकंदर चॅदकी (वय २३), आयुब इसाग सुनठीया (वय २९), इरफान अब्दुलहामीद दुरवेश (वय ४१, रा. गोध्रा, जि. पंचमहाल, गुजरात) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
मुख्य आरोपी सलीम उर्फ सलमान युसुफ जर्दा हा गोध्रा हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. त्याला गुजरातच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. शिक्षा भोगत असताना तो पॅरोल रजेवर गेला. मात्र, त्यानंतर तो परत कारागृहात हजर झाला नाही. त्याने टोळी बनवून चोरीचे गुन्हे करण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड ही ७ जानेवारी रोजी पहाटे आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून मौने आणे या जुन्नर तालुक्यातील गावात असलेल्या इंडीयन ऑईल पेट्रोलपंपाच्या मोकळ्या जागेमध्ये ते टेम्पो घेऊन उभे होते. चोरटयांनी या टेम्पोमधील ऐवजल चोरून नेला होता.
अशाप्रकारचे गुन्हे करणारी टोळी ही गुजरात राज्यातील गोध्रा या ठिकाणची असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली.
संशयितांच्या मोबाईलचा तांत्रिक तपास करून गुन्ह्यात वापरलेल्या टेम्पोचा शोध घेण्यात आला. हा टेम्पो नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथून आरोपींनी नेल्याचे समोर आले. त्यानुसार सलीम जर्दा, साहील पठाण, सुफीयान चॅदकी, आयुब सुनठीया, इरफान दुरवेश यांना ताब्यात घेण्यात आले. अधिक तपास केला असता आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून एकूण १४ लाख ४० हजार ८७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नरचे उपविभागीय अधिकारी रविंद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, सहायक फौजदार चंद्रा डुंबरे, हवालदार विकास गोसावी, विनोद गायकवाड, पंकज पारखे, आमित पोळ, अमित मालुंजे, नविन अरगडे, सचिन रहाणे, ओंकार खुणे, गणेश जगताप यांनी केली.
Godhra massacre made A gang of thieves in Pune
महत्वाच्या बातम्या
- Nirmala Sitharaman’ : कॅन्सरवरील औषधे, टीव्ही, मोबाईल आणि इलेक्ट्रिक कार होणार स्वस्त
- Modi Govt : मोदी सरकारची मध्यमवर्गीयांना आजपर्यंतची सर्वात मोठी भेट, एक लोक कोटी तोटा सहन करून १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
- Devendra Fadnavis भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अर्थसंकल्पाचे कौतुक