माय मराठीसाठी आझाद मैदानातून लढ्याचे रणशिंग ; हिंदी सक्तीच्या आदेशाची होळी करताच उद्धव ठाकरेंची घोषणा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात पहिलीपासून सक्तीच्या हिंदीकरणाविरोधात आज आझाद मैदानातून रणशिंग फुंकण्यात आले. शिवसेना ठाकरे गटाकडून आझाद मैदानात महायुती सरकारने काढलेल्या हिंदी सक्तीच्या आदेशाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रतिकात्मक होळी करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अन्य विरोधी पक्षही सहभागी झाल्याचं दिसून आलं. तसेच काही मराठी कलाकारही या आंदोलनात सहभागी झाले.

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मनसे नेते नितीन सरदेसाई, आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, सुभाष देसाई, संतोष शिंदे, अभिनेता हेमंत ढोमे, काँग्रेस प्रवक्ते युवराज मोहिते सुद्धा उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सगळेच गुलाम झाले नसल्याची प्रतिक्रिया दिली. मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्था यांच्या वतीनेही सक्तीच्या आदेशाची होळी करण्यात आली.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, सगळेच गुलाम झाले नाहीत ही चांगली गोष्ट आहे. मात्र, कोणाचा दुराग्रह आहे हे कोण हे कोणी सांगत नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. पाच जुलै रोजी होणारा मोर्चा हा महा भव्य मोर्चा असेल असे त्यांनी नमूद केलं. त्यांनी सांगितले की जीआरची होळी केली आहे याचा अर्थ जो लागू आहे असे आम्ही मानत नाही.

राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरण अंतर्गत बदल करून इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने मुंबईत 5 जुलै रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे. यापूर्वी राज्यभरामध्ये तालुकास्तरावर हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करत निषेध व्यक्त करण्यात आला.

संजय राऊत म्हणाले की, मुंबईत होणाऱ्या या आंदोलनासाठी सगळ्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. याचा पहिला टप्पा होता तो शासन निर्णयाची होळी करणे. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या सरकारने जो हिंदी सक्तीचा आदेश काढला आहे त्याची होळी करण्यात येणार आहे. यात केवळ शिवसैनिक सामील नाही तर त्या त्या जिल्ह्यातील मराठी जनता, साहित्यिक, लेखक यांनाही आमंत्रित केला आहे. उद्या अधिवेशन आहे अधिवेशनात सुद्धा चर्चा मांडू.

Uddhav Thackeray’s announcement of mandatory Hindi order as soon as Holi is celebrated

महत्वाच्या बातम्या