विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाला ( आप) धक्का बसला असून हरियाणा आणि पंजाबची राजधानी असलेल्या चंदीगडमधील महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या हरप्रीत कौर बाबला महापौरपदी निवडून आल्या आहेत.
आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेस आघाडीस बहुमत असूनही पराभव पत्करावा लागला आहे. महापौरपदाची निवडणूक भाजपने जिंकली आहे.
चंदीगडमधील महापौर निवडणुकीत काँग्रेस आणि आप आघाडीच्या उमेदवार प्रेमलता यांना पराभव पत्करावा लागला आहे. बहुमत असूनही आप – काँग्रेस आघाडीचा महापौरपदाच्या निवडणुकीत पराभव भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली होती आणि महापौरपदासाठी हरप्रीत कौर बाबला यांना उमेदवारी दिली होती. महापौर निवडणुकीत काँग्रेस आणि आपच्या तीन नगरसेवकांनी बंडखोरी केली आणि त्यांनी क्रॉस व्होटिंग केले, ज्याचा फायदा भाजपला झाला आणि बाबला महापौरपदाची निवडणूक जिंकल्या.
वरिष्ठ उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला आहे. काँग्रेसचे उमेदवार जसबीर सिंग बंटी यांनी भाजपच्या उमेदवार बिमला दुबे यांचा पराभव केला. येथे भाजपला १७ आणि काँग्रेसला १९ मते मिळाली. तथापि, येथेही क्रॉस व्होटिंग दिसून आले आणि आप आणि काँग्रेसमधील एका नगरसेवकाने भाजपला मतदान केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आम आदमी पक्षाचे उमेदवार कुलदीप कुमार यांना चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी घोषित केले.
चंदिगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीच्या निकालांना स्थगिती देण्यास पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने नकार दिल्याच्या विरोधात कुलदीप कुमार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर खंडपीठ सुनावणी करत होते, जेथे पीठासीन अधिकारी अनिल मसिह, मतदानादरम्यान आठ मतपत्रिकांवर चिन्ह ठेवताना कॅमेरावर दिसले. मसीह हे भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) अल्पसंख्याक मोर्चाचे सरचिटणीस आहेत आणि न्यायालयीन कामकाजादरम्यान ते उपस्थित होते.
मसीह यांनी ही आठ मते अवैध ठरवून बाजूला ठेवली आणि ३० जानेवारी २०२४ रोजी भाजपचे मनोज सोनकर यांना विजयी घोषित करण्यात आले. सोनकर यांनी १८ फेब्रुवारी २०२४ रोजी पदाचा राजीनामा दिला.
काल , खंडपीठाने उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या न्यायिक अधिकाऱ्याकडून मतपत्रिका तपासणीसाठी सादर करण्याचे आदेश दिले होते.
Harpreet Kaur Babla wins in Chandigarh mayoral election BJP
महत्वाच्या बातम्या