Nehru : नेहरूंनी ‘तो’ प्रस्ताव मंजूर केला असता, तर आज नेपाळ भारताचा भाग राहिला असता !

Nehru : नेहरूंनी ‘तो’ प्रस्ताव मंजूर केला असता, तर आज नेपाळ भारताचा भाग राहिला असता !

Nehru

विशेष प्रतिनिधी 

पुणे : Nehru सध्या नेपाळमध्ये मोठी अराजकता माजली आहे. जेनझींनी केलेल्या आंदोलनामुळे तिथे सत्तापालट होत आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष नेपाळकडे केंद्रित झालंय. आता जरी नेपाळ हा स्वतंत्र देश असला तरी एक काळ असा होता, जेव्हा व्हा नेपाळ हा एक स्वतंत्र देश नव्हता आणि एक राज्य म्हणून हा भूभाग भारतात सामील होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण तेव्हाच तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या एका निर्णयामुळे नेपाळ भारतात सामील होऊ शकला नाही. Nehru

नेपाळमध्ये सध्या काय परिस्थिति?

सध्या नेपाळमध्ये मोठी अराजकता माजली आहे. जेनझींनी केलेल्या आंदोलनामुळे तिथे हिंसक वातावरण निर्माण झाले आहे. तेथील संसद पेटवली गेली, न्यायालयात जाळपोळ झाली, गोळीबारात २० लोकांचा मृत्यू झाला आणि या सगळ्या परिस्थितीत तिथल्या पंतप्रधान, राष्ट्रपती अन गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळेच आता या घटनेमुळे संपूर्ण जगाचं लक्ष नेपाळकडे केंद्रित झालंय. यासगळ्यामुळे आता तिथे सत्तापालट होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. Nehru

नेपाळ भारताचा भाग बनला असता? काय सांगतो इतिहास?

साधारण पहिल्या महायुद्धादरम्यान नेपाळमध्ये लोकशाही अस्तित्वातच नव्हती. तेव्हा फक्त राणा कुटुंबातील व्यक्तीच पंतप्रधान बनत असत. त्यामुळे चंद्रमोहन शमशेर जंग बहादूर हे तेव्हा नेपाळचे पंतप्रधान होते. नेपाळमध्ये राजाच्या दरबारी मंत्रीमंडळ असलं तरी, ते मंत्रिमंडळ देखील केवळ नाममात्रच होतं. तेव्हा राजा त्रिभुवन शाह हे त्या मंत्रिमंडळाचा एक भाग होते. Nehru

जेव्हा जगात पहिलं महायुद्ध सुरु झालं, तेव्हा त्या महायुद्धादरम्यान नेपाळमधल्या राणा आणि शाह या दोन घराण्यात तणाव वाढला. कारण या युद्धाच्या काळात नेपाळच्या राणा कुटुंबाला ब्रिटनच्या वतीने लढण्यासाठी नेपाळ सैन्य पाठवायचे होतं, तर शाह कुटुंबाला या युद्धात तटस्थ भूमिका घ्यायची होती.
तेव्हा या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी अखेर तत्कालीन पंतप्रधान चंद्र शमशेर जंग बहादूर यांनी राजा त्रिभुवन शाह त्यांच्यावर दबाव टाकून, त्यांना धमकी देऊन नेपाळच्या सैन्याला युद्धात ढकललं. त्यानंतर या दोन्ही कुटुंबांमधील तणाव वाढतच गेला. Nehru

याच काळात नेपाळमधल्या प्रजा परिषदेने राणा घराण्याचं वर्चस्व संपवण्यासाठी लढा सुरु केला. तेव्हा राजा त्रिभुवन शाह यांनी १९५० मध्ये आपल्या कुटुंबासह नेपाळमधील भारतीय दूतावासात आश्रय घेतला. आता जेव्हा राजा त्रिभुवन शाह यांनी भारतीय दुतावासात आश्रय घेतला होता, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा महेंद्र आणि नातू वीरेंद्र हे देखील होते. यानंतर नेपाळचे तत्कालीन पंतप्रधान चंद्रमोहन शमशेर जंग बहादूर राणा यांनी एक आपत्कालीन बैठक बोलावली. त्यांनी राजा त्रिभुवन शाह यांच्यावर दबाव टाकायला सुरुवात केली. तेव्हाच तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दोन विमानं पाठवून राजा त्रिभुवन आणि त्यांच्या कुटुंबियांना भारतात बोलावून घेतलं. Nehru

भारताने नेपाळच्या शाह कुटुंबाला मदत केल्यामुळे राणा कुटुंबावरील दबाव मात्र वाढला. कालांतराने त्यांचा नेपाळमध्ये राणा कुटुंबाला होत असलेला विरोध वाढत गेला. त्यानंतर अखेर १९५१ मध्ये राजा त्रिभुवन शाह नेपाळला परत गेले. त्यानंतरच्या काळात राणा कुटुंबाचं वर्चस्व संपुष्टात आलं आणि राजा त्रिभुवन यांनी आधुनिक नेपाळची निर्मिती केली. Nehru

या सगळ्या परिस्थितीत जेव्हा राजा त्रिभुवन शाह भारताच्या आश्रयासाठी आले होते. भारत त्यांना सहकार्य करत होता आणि नेपाळमध्ये राणा कुटुंबाची दहशद वाढत होती. तेव्हाच राजा त्रिभुवन शाह यांनी पंडित नेहरूंसमोर नेपाळच्या भारतातील विलिनीकरणाचा प्रस्ताव ठेवला होता. तेव्हा जर नेहरूंनी तो प्रस्ताव स्वीकारला असता, तर आज सिक्कीमप्रमाणे नेपाळ हे देखील भारतातील एक राज्य बनलं असतं. मात्र नेहरूंनी तेव्हा तो प्रस्ताव नाकारला आणि नेपाळ या देशाचं स्वतंत्र अस्तित्व टिकून राहिलं. Nehru

If Nehru had approved ‘that’ proposal, Nepal would have remained a part of India today!

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023