विशेष प्रतिनिधी
दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणूक तोंडावर असताना आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना पक्षातूनच मोठ्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. तुमच्यावरील विश्वास उडाला आहे, असे म्हणत आठ माजी आमदारांनी राजीनामा दिला आहे. Kejriwal
येत्या ५ तारखेला दिल्लीत मतदान होणार आहे. मतदानाला अवघे ५ दिवस बाकी असताना दिल्लीच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप आला आहे. आम आदमी पार्टीच्या आठ आमदारांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. निवडणुकीला पाच दिवस बाकी असताना आठ आमदारांनी अशाप्रकारे राजीनामा दिल्याने अरविंद केजरीवालांना मोठा धक्का बसला आहे.
राजीनामा दिलेल्या आमदारांमध्ये नरेश यादव (मेहरौली), रोहित कुमार (त्रिलोकपुरी), राजेश ऋषी (जनकपुरी), मदन लाल (कस्तुरबा नगर), पवन शर्मा (आदर्श नगर), भावना गौड (पालम), गिरीश सोनी (मादीपूर) आणि बीएस जून (बिजवासन) यांचा समावेश आहे. बीएस जून हे राजीनामा देणारे पहिले आमदार होते. अरविंद केजरीवाल यांनी या सर्व आमदारांची तिकीटं कापली होती. त्यामुळे पक्षांतर्गत त्यांच्याविरोधात नाराजी वाढली होती. शुक्रवारी या नाराजीचा विस्फोट झाला आणि आठ आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला.
पालमच्या भावना गौड यांनी आपल्या राजीनामा पत्रात पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल यांना म्हटलें आहे की माझा तुमच्यावरील विश्वास उडाला आहे. नरेश यादव हे यापूर्वी मेहरौलीचे उमेदवार होते. डिसेंबरमध्ये कुराण अवमान प्रकरणात पंजाब न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते आणि त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दिल्ली निवडणुकीसाठी आपने उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली तेव्हा पक्षाने नरेश यादव यांच्या जागी महेंद्र चौधरी यांना मेहरौलीचे उमेदवार म्हणून घोषित केले. तेव्हा पासून नरेंद्र यादव पक्षात नाराज होते.
Kejriwal lost faith, eight AAP MLAs resigned
महत्वाच्या बातम्या