विशेष प्रतिनिधी
प्रयाराज : प्रयागराज येथील संगम नोजवर महाकुंभ मेळ्यादरम्यान चेंगराचेंगरी होऊन 17 भाविकांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले आहेत.
मौनी अमावस्या स्नानासाठी लाखो भाविक जमले होते. त्यामध्ये अचानक गर्दी झाली. त्यात 17 भाविकांचा मृत्यू झाला. प्रशासनाने आत्तापर्यंत 17 जणांच्या मृत्यूंची पुष्टी केली आहे.
या घटनेमुळे संगम नोजवर गोंधळ निर्माण झाला. घटनेनंतर लगेचच रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. मृतांचे शव तेथून नेण्यात आले. जखमी भाविकांना मेळा परिसरातील केंद्रीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
महाकुम्भ-2025, प्रयागराज आए प्रिय श्रद्धालुओं,
माँ गंगा के जिस घाट के आप समीप हैं, वहीं स्नान करें, संगम नोज की ओर जाने का प्रयास न करें।
आप सभी प्रशासन के निर्देशों का अनुपालन करें, व्यवस्था बनाने में सहयोग करें।
संगम के सभी घाटों पर शांतिपूर्वक स्नान हो रहा है। किसी भी अफवाह…
— Yogi Adityanath (@myogiadityanath) January 29, 2025
प्रयागराज येथील संगमवर बुधवारी रात्री अंदाजे दीड वाजता कुंभातील मौनी अमावस्या अमृत स्नानादरम्यान मोठ्या गर्दीमुळे गर्दीमुळे गोंधळ उडाला. गर्दीच्या अनेक व्हिडिओ फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की पोलीस जखमी लोकांना हॉस्पिटलमध्ये नेत आहेत. गर्दीच्या झोतामुळे प्रभावित झालेले भाविक कुंभ मेळ्याच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत आहेत.
जेव्हा लोक स्नानासाठी जात होते, तेव्हा बॅरिकेडिंगजवळ लोक झोपले होते. यामुळे पडलेल्या लोकांच्या पायात अडकून काही लोक पडले. जेथे काही लोक पडले तेथून मागून येणाऱ्या लोकांची गर्दी एकामागून एक एकमेकांच्या अंगावर पडत गेली.
अध्यात्मिक गुरू देवकीनंदन ठाकुर यांनी गर्दीच्या घटनेबाबत म्हटले, “मी संगम घाटावर गेलो नाही कारण तेथे खूप गर्दी असते. मी लोकांना विनंती करतो की संगम घाटावरच स्नान करण्याचा हट्ट धरू नका. संपूर्ण गंगा आणि यमुना नद्या या काळात ‘अमृत’ आहेत, जर तुम्ही कुठेही स्नान केले तर तुम्हाला तितकेच पुण्य मिळेल.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाने एक्स वर पोस्ट करून लोकांना अफवांकडे लक्ष न देण्याचा आग्रह केला आहे. माता गंगेच्या ज्या घाटाजवळ आहेत, तेथेच स्नान करा, संगम नोजकडे जाण्याचा प्रयत्न करू नका. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, व्यवस्था करण्यात सहकार्य करा. कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका, असे. त्यांनी म्हटले आहे.
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सरकारकडून भाविकांसाठी योग्य व्यवस्था करण्याची विनंती केली आहे.
17 devotees killed in Kumbh Mela stampede at Prayagraj
महत्वाच्या बातम्या