विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने खजुराहोच्या जावरी मंदिरातील भग्न भगवान विष्णू मूर्तीची पुनर्स्थापना करण्याची याचिका फेटाळली. सात फूट उंचीची ही मूर्ती शतकांपूर्वी मुघल आक्रमणांत शिरच्छेदित झाली होती. ती आजही भग्न अवस्थेत आहे.
ही याचिका राकेश दलाल नावाच्या भक्ताने दाखल केली होती. त्यांचा दावा होता की मूर्ती पुनर्स्थापना ही केवळ पुरातत्त्वाशी संबंधित बाब नाही, तर श्रद्धा, प्रतिष्ठा आणि हिंदूंना अखंड देवप्रतिमेची पूजा करण्याचा मूलभूत अधिकार आहे. वरिष्ठ वकील संजय एम. नुली यांनी दलाल यांचे प्रतिनिधित्व करत, पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला (ASI) मूर्ती दुरुस्त करून मंदिराची पवित्रता पुनर्स्थापित करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली होती.
परंतु, मुख्य न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या याचिकेवर थेट उपरोधिक प्रतिक्रिया दिली. न्यायालयाने म्हटले – “ही पब्लिसिटी इंटरेस्ट लिटिगेशन आहे. तुम्ही भगवान विष्णूचे भक्त आहात ना? मग जा आणि प्रार्थना करा.”
आता प्रश्न उपस्थित केला आहे की जर अशीच टिप्पणी मुस्लिम वा ख्रिश्चन समाजातील याचिकांवर झाली असती, तर संताप उसळला असता, आंदोलन झाले असते, आंतरराष्ट्रीय मंचांवर दडपण आले असते. मात्र हिंदूंना अपमानित करणाऱ्या टिप्पणीवर शांतता पसरते. ही एकतर्फी धर्मनिरपेक्षता असल्याचे मत नोंदवले जात आहे.
अल्पसंख्यांक समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करतो, त्यामुळे त्यांचे प्रश्न गांभीर्याने घेतले जातात. तर हिंदू कायदेशीर मार्गाने न्याय मागतात आणि त्यांना उपरोधाने हिणवले जाते. “जा आणि प्रार्थना करा” हा संदेश हिंदूंना कायद्यातूनही उपेक्षित करणारा असल्याचे आरोप आहेत.
Lord Vishnu in Khajuraho rejected
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा