विशेष प्रतिनिधी
पाटणा: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांच्या व्यासपाठीवरून माझ्या आईला शिवीगाळ केली. हा अपमान फक्त माझ्या आईचा नाही, तर देशातील प्रत्येक आईचा, बहिणीचा आणि मुलींचा आहे, अशी भावूक प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. Narendra Modi
बिहारच्या महिलांना बचत गटाच्या कार्यक्रमात. काँग्रेसच्या व्यासपाठीवरून आईला झालेल्या शिवीगाळीचा उल्लेख होताच ते भावूक झाले. ते म्हणाले, माझ्या आईने गरिबी पाहिली आहे. आईचं आपलं जग असते, आईच आपला स्वाभिमान असतो. ही समृद्ध परंपरा असणाऱ्या बिहारमध्ये काही दिवसांपूर्वी जे घडले, त्याची मी कल्पनाही केली नव्हती, बिहारमधल्या जनतेनेही हा विचार केला नव्हता असं त्यांनी सांगितले. Narendra Modi
बिहारमध्ये आरजेडी-काँग्रेस व्यासपाठीवरून माझ्या आईला शिवी देण्यात आली. ही शिवी फक्त माझ्या आईचा अपमान नाही तर देशातील आई, बहीण आणि मुलींचा अपमान आहे. हे पाहून आणि ऐकून बिहारच्या प्रत्येक आईला किती वाईट वाटले असेल याची मला जाणीव आहे. मला माहिती आहे, माझ्या हृदयात जे दुःख आहे तेच दुःख बिहारच्या लोकांनाही आहे. म्हणूनच आज जेव्हा मी इतक्या मोठ्या संख्येने बिहारच्या लाखो माता आणि भगिनींना पाहत आहे, आज मी माझ्या मनातील दुःख तुमच्यासोबत शेअर करत आहोत. जेणेकरून तुमच्या माता आणि भगिनींच्या आशीर्वादाने मी हे सहन करू शकेन.
प्रत्येक आई आपल्या मुलाला मोठ्या तपस्येने सांभाळते, मुलांपेक्षा मोठं आईपुढे काहीच नसते. मी माझ्या आईला लहानपणापासून असेच पाहतोय. गरिबी आणि संकटाचा सामना करून माझ्या आईने आम्हा भावंडांना वाढवले. पाऊस पडायचा तेव्हा घरात छतातून पाणी गळू नये यासाठी ती मेहनत घ्यायची. स्वत: आजारी पडली तरी आम्हाला कळू द्यायची नाही. ती सतत काम करत राहायची. जर तिने एक दिवसही आराम केला तर मुलांना वेदना होतील हे तिला कळायचे. मुलांसाठी नवनवीन कपडे घ्यायची, स्वत: साडीही खरेदी करत नव्हती. देशातील कोट्यवधी आई असेच मुलांना सांभाळत असेल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
My Mother, Along With Every Mother, Sister and Daughter in the Nation Insulted by Abuses,” says Emotional Narendra Modi
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांनी आम्हाला ज्ञान शिकवू नये, राधाकृष्ण विखे पाटील यांचा टोला
- शरद पवार भेटीला पोचणार म्हटल्याबरोबर मनोज जरांगे ताठ; उर्मट भाषेत फडणवीसांच्या पाठोपाठ राज ठाकरेंवर निशाणा!!
- मनोज जरांगे प्रमाणिक, पण त्याचा वापर, रोहित पवारांकडून रसद, नितेश राणे यांचा आरोप
- स्वतःचं पोरगं निवडणुकीत पाडलं, कधीपर्यंत भाजपची री ओढणार? मनाेज जरांगे यांचा राज ठाकरेंना सवाल