विशेष प्रतिनिधी
गुरदासपूर : पंजाबमध्ये झालेल्या ढगफुटी व मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ सप्टेंबर २०२५ रोजी राज्याचा दौरा केला. त्यांनी पुरग्रस्त भागांचे हवाई सर्वेक्षण करून नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आणि गुरदासपूर येथे अधिकाऱ्यांसह व लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेतली. Narendra Modi
बैठकीनंतर पंतप्रधानांनी पंजाबसाठी १,६०० कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली. ही मदत आधीच राज्याकडे उपलब्ध असलेल्या १२,००० कोटी रुपयांव्यतिरिक्त असेल. केंद्र सरकारकडून तातडीने राज्य आपत्ती निवारण निधीचा (SDRF) दुसरा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधी देखील अगोदरच दिला जाणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
कृषी व पशुपालन हा प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे अधोरेखित करत मोदींनी सांगितले की: ज्यांच्याकडे वीज कनेक्शन नाही त्या शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत दिली जाणार. गाळ भरलेल्या किंवा वाहून गेलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून (RKVY) प्रकल्पनिहाय मदत. डिझेलवर चालणाऱ्या बोरवेल पंपांना सौर पॅनलसह मायक्रो इरिगेशन योजनेशी (Per Drop More Crop) जोडून दिलासा. जनावरांसाठी लघु किट्सचे वितरण, ज्यामुळे पशुपालकांना तातडीचा दिलासा मिळेल.
पंतप्रधानांनी स्पष्ट केलं की पुराच्या परिणामातून बाहेर येण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोनाची गरज आहे. प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण अंतर्गत पुरग्रस्तांना घरे पुन्हा बांधण्यासाठी मदत.. राष्ट्रीय महामार्गांची पुनर्बांधणी व वाहतूक व्यवस्थेची दुरुस्ती. शाळांची पुनर्बांधणी आणि विद्यार्थ्यांना तातडीचे साहाय्य. पीएम राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मार्फत तातडीच्या गरजांची पूर्तता.
राज्यातील नुकसानीचे सविस्तर अहवाल आणि विशिष्ट प्रस्ताव आल्यावर त्यानुसार केंद्र सरकार आणखी प्रकल्पनिहाय मदत देईल, असे मोदींनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांच्या या भेटीमुळे पंजाबमधील पुरग्रस्त शेतकरी, पशुपालक व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या या पॅकेजमुळे पुनर्वसन आणि पुनर्बांधणीची गती वाढेल अशी अपेक्षा आहे.
Narendra Modi announces Rs 1,600 crore relief package
महत्वाच्या बातम्या
- Vice Presidential election : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांना दणका; तब्बल 30 मते फुटली !
- Ayush Komkar murder case : आयुष कोमकर हत्या प्रकरण; बंडू आंदेकरसह 8 जण अटकेत
- double-decker buses : आता पुण्यातही धावणार डबल-डेक्कर बस?
- Pune Commissioner : पुण्यातील रखडलेल्या प्रकल्पांबाबत आयुक्त घेणार मुख्यमंत्र्यांची भेट!