विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पाण्यात विष मिसळल्याच्या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना चँगलेच फटकारले आहे.
केजरीवालांच्या वक्तव्याने हरियाणातील लोकांचा , त्याचबरोर त्यांनी संपूर्ण देशातील जनतेचा अपमान केला आहे. हा आपल्या संस्कृतीचा अपमान आहे. केजरीवालांना अशी भाषा शोभत नाही. दिल्लीची जनता त्यांना येत्या निवडणुकीत चांगलाच धडा शिकवेल. त्यांचा अंहकार यमुनेच्या पण्यात बुडेल, असे मोदी म्हणाले.
दिल्ली विधानसभेची निवडणूक रंगतदार झाली आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी आरोप केला होता की हरियाणात भाजपाचे लोक यमुना नदीच्या पाण्यात विष मिसळत आहेत आणि तेच पाणी दिल्लीत पाठवलं जात आहे. केजरीवाल यांच्या या वक्तव्यानंतर भाजपाचे दिल्लीतले व देश पातळीवरील नेते आप प्रमुखांवर तुटून पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी केजरीवालांच्याव वक्तव्यावर संताप व्यक्त करत म्हणाले, “मला व दिल्लीत राहणाऱ्या सर्व न्यायाधीशांना मारण्यासाठी आपले हरियाणातील बांधव यमुनेच्या पाण्यात विष मिसळतील का?”
दिल्लीच्या उस्मानपूर भागात भाजपाच्या एका प्रचारसभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरियाणातील लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या भितीने ते बिथरले आहेत. मला विचारायचं आहे की हरियाणाचे लोक त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या पाण्यात विष मिसळतील का? मोदी व देशातील सर्व न्यायाधीश, जगभरातील विविध देशांच्या दूतावासातील अधिकारी तेच पाणी पितात.
हरियाणातील लोक मोदी व न्यायाधीशांना मारण्यासाठी त्यांच्या पाण्यात विषय मिसळतायत असं केजरीवाल म्हणत आहेत. मुळात असा विचार तरी कोणी करू शकतं का? आम आदमी पार्टी व अरविंद केजरीवालांनी केवळ हरियाणातील नव्हे तर संपूर्ण देशातील जनतेचा अपमान केला आहे. एखाद्याची चूकभूल माफ करणं ही आपली संस्कृती आहे. परंतु, कोणी जाणून बुजून चुका करत असेल, देशालाच अपमानित करत असेल तर देश त्याला कधीच माफ करत नाही.
हरियाणाचे लोक देशभक्त आणि धार्मिक आहेत. केजरीवालांच्या वक्तव्याने हरियाणातील लोकांचा अपमान झाला आहे, त्याचबरोर त्यांनी संपूर्ण देशातील जनतेचा अपमान केला आहे. हा आपल्या संस्कृतीचा अपमान आहे. केजरीवालांना अशी भाषा शोभत नाही. दिल्लीची जनता त्यांना येत्या निवडणुकीत चांगलाच धडा शिकवेल. त्यांचा अंहकार यमुनेच्या पण्यात बुडेल.
Narendra Modi reprimanded Kejriwal for his statement of mixing poison in water
महत्वाच्या बातम्या