Nirmala Sitharaman : पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक, टॅक्स स्लॅबशी संबंध नाही, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या महत्वाच्या घोषणा

Nirmala Sitharaman : पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक, टॅक्स स्लॅबशी संबंध नाही, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या महत्वाच्या घोषणा

Nirmala Sitharaman

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Nirmala Sitharaman पुढील आठवड्यात सरकार नवीन आयकर विधेयक आणणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले आहे. नव्या आयकर विधेयकाचा टॅक्स स्लॅबशी संबंध नाही. नवीन बिल म्हणजे आयकराच्या पद्धतीत बदल असल्याचे त्यांनी सांगितले.Nirmala Sitharaman

मोदी सरकारच्या तिसऱ्या काळातील अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी सादर केला. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत.त्या पुढीलप्रमाणे :
१. 20,000 कोटी रुपयांचे अणुऊर्जा मिशन तयार केले जाईल, 2047 पर्यंत 100 GW अणुऊर्जा क्षमता निर्माण करण्याचे लक्ष्य आहे.



२. वीज वितरण कंपन्यांमधील सुधारणांना प्रोत्साहन दिले जाईल, सुधारणांचा पाठपुरावा करण्यासाठी राज्यांना GSDP च्या 0.5 टक्के कर्जाची परवानगी दिली जाईल.

३, प्रथमच व्यवसाय करणाऱ्या पाच लाख महिला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उद्योजकांना सरकार 2 कोटी रुपयांचे कर्ज देणार .

४, परवडणाऱ्या घरांची अतिरिक्त 40,000 युनिट्स 2025 मध्ये पूर्ण केली जातील.

५. सरकार 120 गंतव्यस्थानांना जोडण्यासाठी सुधारित उडान योजना सुरू करणार आहे, ज्यामुळे 4 कोटी अतिरिक्त प्रवाशांना मदत होईल.

६. व्हिसासाठीचे नियम सोपे करणार. लाईव्ह व्हिसाची पद्धत आणखी सोपी होणार,भारतात उपचार घेऊ इच्छिणाऱ्यांना सहज व्हिसा मिळणार.

७. भगवान गौतम बुद्धांशी संबंधित जागांचा विकास करणार.

८. आयआयटीच्या 6500 जागा वाढवणार

९. . देशात 3 AI एक्सल्स सेंटर उभारणार

१०.कर्करोग व अशा इतर गंभीर आजारांवर उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या एकूण ३६ जीवनावश्यक औषधांना मूलभूत कस्टम ड्युटीमधून पूर्णपणे सूट. याशिवाय इतर ६ जीवनावश्यक औषधांना कस्टम ड्युटीतून सूट देऊन ते ६ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात येईल.

११. छोट्या व मध्यम उद्योगांसाठी व नवउद्योजकांसाठी नवीन क्रेडिट व्यवस्था राबवली जाईल

New Income Tax Bill next week, no relation to tax slabs, Union Finance Minister Nirmala Sitharaman’s important announcement

महत्वाच्या बातम्या

 

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023