विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर हल्ला झालेल्य़ा प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. कोणत्याही क्षणी पोलीस आरोपीला घेऊन येणार आहेत. तसेच आरोपीला बांद्रा पोलिस स्टेशनमध्ये हजर केले जाऊ शकते अशी माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात सैफवर तीन जणांनी हल्ले केले होते. यातील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर इतर दोन आरोपी अद्याप फरार आहेत.पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
आरोपी चोरटा हा लोकल ट्रेनने वांद्रयात आला होता. इमारतीच्या नजीक पोहोचल्यानंतर त्याने दुसऱ्या एका इमारतीत शिरूर सैफच्या इमारतीत शिरकाव केला.
इमारतीत जरी चोरटा शिरला असला तरी त्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा आहे. इमारतीच्या लिफ्टमधून प्रवास करायलाही अॅक्सेस कार्डचा वापर करावा लागतो. त्यात इमारतीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात सीसीटीव्ही आहेत. त्यामुळे सहजासहजी इमारतीच्या आत शिरणे सोप्पे नाही आहे.
मात्र चोरट्याने सैफच्या घरात शिरण्यासाठी इमर्जन्सी पायऱ्यांचा वापर केला होता, अशाप्रकारे हा चोरटा सैफचा घरात शिरला. पायऱ्यांवरून घरात शिरणाऱ्या चोराचं लोकेशन ट्रेस करण्यात पोलिसांना यश आलं आहे. आरोपी प्रभादेवीत असल्याची माहिती होती. त्यानुसार पोलिसांनी चोरट्याला माग काढत त्याला ताब्यात घेण्यात यश आलं आहे.
One accused arrested in actor Saif Ali Khan attack case
महत्वाच्या बातम्या
- शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
- कुणाशी जरी लागेबांधे असले तरी आरोपीला सोडणार नाही, एकनाथ शिंदे यांची ग्वाही
- प्रजासत्ताकदिनी काँग्रेसची ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅली
- सर्वोच्च न्यायालयात निर्णय झाला तर तीन-चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मुख्यमंत्र्यांची माहिती