विशेष प्रतिनिधी
पणजीः Goa Chief Minister Pramod Sawant slams : बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील जाले विधानसभा मतदारसंघातील बिठौली गावात निवडणूक प्रचारादरम्यान एका व्हायरल व्हिडीओने देशभर संतापाची लाट पसरली आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत माता हीराबेन मोदी यांच्याविषयी अत्यंत अपमानजनक भाषेचा वापर झाल्याचे दिसून आले. या कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राजद नेते तेजस्वी यादव यांचे पोस्टरही दिसले. याप्रकरणी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे.
डॉ. सावंत म्हणाले, “राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी व्यासपीठावरून वापरलेल्या असंस्कृत आणि अपमानकारक वक्तव्यांचा मी तीव्र निषेध करतो. ही काँग्रेस आणि महागठबंधनच्या नीच आणि रसातळाला गेलेल्या विचारसरणीचे द्योतक आहे. भारतीय लोकशाहीत अशा विचारांना अजिबात स्थान नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातेचा अपमान म्हणजे या देशातील प्रत्येक महिलेचा अवमान आहे. या घटनेनंतर कितीही माफी मागितली तरी भारतातील जनता काँग्रेसच्या या पातकाला कधीच विसरणार नाही.”
सावंत पुढे म्हणाले, “पंतप्रधान मोदींविरुद्ध अशी नीच भाषा सहन केली जाणार नाही. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या प्रचार मंचावरून पंतप्रधानांच्या आदरणीय मातेविषयी अत्यंत अपमानजनक शब्दांचा वापर झाला. राजकारणात अशी असंस्कृतपणा यापूर्वी कधीही पाहायला मिळाला नव्हता. काँग्रेस-राजदच्या प्रचाराने सर्व मर्यादा ओलांडली असून हे दोन्ही पक्ष खालच्या पातळीवर उतरले आहेत. त्यांच्याकडे सकारात्मक मुद्दे नसल्याने त्यांनी चारित्र्यहनन आणि असभ्य भाषेचा आधार घेतला आहे.”
डॉ. सावंत यांनी सांगितले, “गोव्याच्या आणि संपूर्ण देशाच्या जनतेच्या वतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पूर्ण पाठिंबा व्यक्त करतो. या निंदनीय घटनेने पुन्हा एकदा इंडिया आघाडीची नकारात्मक मानसिकता उघड केली आहे. भारतातील जनता अशा खालच्या राजकारणाला स्पष्टपणे नाकारेल.”
Opposition’s uncivilized statements, Goa Chief Minister Pramod Sawant attacks Rahul-Tejashwi
महत्वाच्या बातम्या
- किती माजलाय तो जरांग्या, भाषा मग्रुरीची : गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबाेल
- मंत्र्याला काढण्याची घटनेतच तरतूद तर घटना दुरुस्ती कशासाठी, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
- न्यायदेवता अन्याय करणार नाही, मुंबईत जाणारच : मनाेज जरांगेंचा निर्धार
- एकेरी भाषा, आयाबहिणींवर अपशब्द खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाेज जरांगेंना इशारा