विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : Kashmiri काश्मिरी जनतेचा आत्मनिर्णयाचा मूलभूत अधिकार निश्चित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली निष्पक्ष यंत्रणेद्वारे तोडगा काढला पाहिजे, असे पाकिस्तानने सातत्याने म्हटले आहे.Kashmiri
न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ८०व्या अधिवेशनात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आपल्या देशाच्या सुरक्षेचा, शांतीचा आणि भविष्यातील राजकीय दिशेचा मुद्दा जगासमोर ठेवला. आपल्या नेहमीच्या भुमिकेप्रमाणे त्यांनी भारताला काश्मीर प्रश्नावर संवादाची तयारी दाखवण्याचे आवाहन केले, मात्र त्याच वेळी भारतीय हल्ल्यांपासून पाकिस्तानने स्वतःचे रक्षण करण्यासाठी केलेल्या कारवायांचेही दावे केलKashmiri
शाहबाज शरीफ यांनी आपल्या भाषणाची सुरुवात काश्मीर प्रश्नाने केली. त्यांनी म्हटले की, “काश्मिरी जनतेचा आत्मनिर्णयाचा अधिकार हे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य झालेले सत्य आहे. हा प्रश्न फक्त संवादाने आणि संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखालील निष्पक्ष यंत्रणेद्वारेच सुटू शकतो.”
पाकिस्तानने अनेकदा या मुद्याला आंतरराष्ट्रीय रंगमंचावर आणले असले तरी भारताने यास कडाडून विरोध दर्शवला आहे. भारताचे मत नेहमीच ठाम आहे की जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय आहे आणि बाह्य हस्तक्षेप मान्य होणार नाही.
Pakistan demands recognition of Kashmiri people’s fundamental right to self-determination at UN
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!