विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: बजेट सत्राच्या प्रारंभी मी समृद्धीची देवी, लक्ष्मी मातेला नमन करतो. अशा वेळी लक्ष्मी मातेचे स्मरण करणे ही आपली जुनी परंपरा . लक्ष्मी माता ही सिद्धी देते. आई लक्ष्मी गरीब, मध्यम वर्गावर विशेष कृपा ठेवेल, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पात गोरगरिबांसाठी विशेष योजना असल्याचे संकेत दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसर्या कार्यकाळातील संपूर्ण अर्थसंकल्प सादर होत आहे. 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बजेट सादर करतील. आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे.
आज बजेट सत्राच्या प्रारंभी मी समृद्धीची देवी, लक्ष्मी मातेला नमन करतो. अशा वेळी लक्ष्मी मातेचे स्मरण करणे ही आपली जुनी परंपरा आहे. लक्ष्मी माता ही सिद्धी देते. आई लक्ष्मी गरीब, मध्यम वर्गावर विशेष कृपा ठेवेल, असे पंतप्रधान म्हणाले आहेत.
महागाई वाढत असताना अनेकांचे उत्पन्नात त्यामानाने वाढ न झाल्याने, करांचा बोजा कमी करण्याची अपेक्षा मध्यमवर्गाकडे आहे. अस्तीत्वातील तरतुदींप्रमाणे नवीन करप्रणालीत, सात लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या करदात्यांना कोणताही आयकर द्यावा लागत नाही, ही मर्यादा वाढवण्याची अपेक्षा आहे.
मध्यमवर्गाबाबत अर्थमंत्री काय घोषणा करणार आहेत? याकडे नोकरदारांच्या नजरा खिळल्या असतील. २०२५ च्या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय आणि करदात्यांना अनेक प्रकारच्या सवलती मिळण्याची अपेक्षा आहे
PM Modi said Ai Lakshmi will bestow special grace on the poor, middle class
महत्वाच्या बातम्या