विशेष प्रतिनिधी
इंफाळ : PM Narendra Modi मणिपूरमधील जातीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यात मणिपूरला भेट देण्याची शक्यता आहे. पंतप्रधान १३ व १४ सप्टेंबर रोजी आसाम व मिझोरममध्ये नियोजित कार्यक्रमांसाठी जाणार असून, मिझोरमहून ते थेट मणिपूरला पोहोचतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.PM Narendra Modi
राज्याचे मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल यांनी रविवारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन “सप्टेंबर २०२५ मधील प्रस्तावित व्हीव्हीआयपी भेटी”ची प्राथमिक तयारी केली. बैठकीत पोलीस विभागाला इंफाळमधील ऐतिहासिक कांगला किल्ला आणि चुराचांदपूर येथील पीस ग्राउंड या दोन ठिकाणी सुरक्षा व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. इंफाळ हे मैतेई बहुल खोऱ्यात असून चुराचांदपूर हा कुकी बहुल डोंगराळ जिल्हा आहे.PM Narendra Modi
फेब्रुवारीपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असून, हिंसाचारात मोठी घट झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तरीही आतापर्यंत झालेल्या संघर्षात २५० हून अधिक जणांचा बळी गेला असून ५७ हजारांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत.PM Narendra Modi
या पार्श्वभूमीवर राज्य पोलिस महासंचालकांनी ७ ते १४ सप्टेंबरदरम्यान कोणत्याही कर्मचाऱ्याला सुट्टी न देण्याचे आदेश जारी केले आहेत.
मोदींच्या संभाव्य भेटीबाबत राज्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. “ही भेट खूप उशिरा होत आहे” अशी टीका होत असतानाच, कुकी जो कौन्सिलचे प्रवक्ते गिंझा वुआलझोंग यांनी पंतप्रधानांनी कुकी नेत्यांशी प्रत्यक्ष चर्चा करावी आणि विस्थापित नागरिकांच्या छावण्यांना भेट द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
दरम्यान, मैतेई समाजाच्या संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कोकोमीचे सल्लागार जितेंद्र निंगोंबा यांनी मोदींच्या दौऱ्यामुळे शांततेसाठी ठोस पावले उचलली जातील अशी आशा व्यक्त केली.
एनडीए आमदारांमध्येही राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणून पुन्हा लोकप्रतिनिधींचे सरकार स्थापन करण्याची मागणी वाढीस लागली आहे. या मागणीत माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांचा आणि त्यांच्याशी विरोधी असलेल्या आमदारांचा समावेश आहे.
PM Narendra Modi to visit Manipur soon Chief Minister holds preparatory meeting, violence reduced after President’s rule
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांनी आम्हाला ज्ञान शिकवू नये, राधाकृष्ण विखे पाटील यांचा टोला
- शरद पवार भेटीला पोचणार म्हटल्याबरोबर मनोज जरांगे ताठ; उर्मट भाषेत फडणवीसांच्या पाठोपाठ राज ठाकरेंवर निशाणा!!
- मनोज जरांगे प्रमाणिक, पण त्याचा वापर, रोहित पवारांकडून रसद, नितेश राणे यांचा आरोप
- स्वतःचं पोरगं निवडणुकीत पाडलं, कधीपर्यंत भाजपची री ओढणार? मनाेज जरांगे यांचा राज ठाकरेंना सवाल