प्रणवदांच्या कन्येचा काँग्रेसवर निशाणा, बाबांसाठी साधी शोकसभाही घेतली नाही

प्रणवदांच्या कन्येचा काँग्रेसवर निशाणा, बाबांसाठी साधी शोकसभाही घेतली नाही

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मृतीस्थळ उभारण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसने केली. केंद्र सरकारकडून स्मृतिस्थळासाठी जागा देण्याचे मान्य करण्यात आले आहे. स्मृतीस्थळाच्या वादानंतर आता भारताचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिवंगत नेते प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जीने मात्र काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्मृतीस्थळाची मागणी केल्यावर संताप व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, माझ्या बाबांचे निधन झाल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकारी समितीने साधी शोकसभाही आयोजित केली नव्हती.

शर्मिष्ठा मुखर्जी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, बाबांचे ज्यावेळी निधन झाले, त्यावेळी काँग्रेसच्या कार्यकारी समितीने साधी शोकसभाही आयोजित केली नाही. तेव्हा काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने मला सांगितले की, राष्ट्रपतींसाठी अशाप्रकारे शोकशभा आयोजित केली जात नाही. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. बाबांच्या डायरीतून मला कळले की, माजी राष्ट्रपती केआर नारायणन यांचे निधन झाल्यानंतर कार्यकारी समितीची बैठक बोलाविण्यात आली होती आणि बाबांनीच शोक संदेशाचा मसुदा लिहिला होता.

Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 100 दिवसांचा ॲक्शन प्लॅन

शर्मिष्ठा मुखर्जी यांनी भाजपाचे नेते सीआर केसवन यांच्या एका एक्स पोस्टला शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. केसवन यांनी काँग्रेसने स्मृतीस्थळासाठी जे पत्र लिहिले त्याचा दाखला देऊन टीका केली होती. काँग्रेसने गांधी कुटुंबा व्यतिरिक्त इतर राजकीय नेत्यांची कशी अवहेलना केली, यावर केसवन यांनी प्रकाश टाकला होता.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या प्रणव मुखर्जी यांची पक्षाने अवहेलना केली होती. 2004 साली जेव्हा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीचे सरकार आले तेव्हा प्रणवदा पंतप्रधान होतील असे वाटत होते. पण त्यांना संधी मिळाली नाही. प्रणव मुखर्जी यांनी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाला भेट दिली होती. यावरून काँग्रेसने त्यांना बाजूला केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र प्रणव मुखर्जी यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला.

Pranav Mukherjee daughter targeted Congress, did not even hold a simple condolence meeting for Baba

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023