विशेष प्रतिनिधी
पाटणा : Narendra Modi आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्येही महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी भाजप – जनता दल आघाडीने योजना आखली आहे. बिहारमध्ये महिलांच्या सबलीकरणासाठी आणि स्वावलंबनासाठी महत्त्वाची ठरणारी ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’ पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू करणार आहेत.Narendra Modi
पंतप्रधान राज्यातील 75 लाख महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी ₹10,000 थेट जमा करणार असून एकूण ₹7,500 कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला प्रारंभी ₹10,000 ची अनुदानरूपी मदत थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे दिली जाईल. त्यानंतरच्या टप्प्यांत, ₹2 लाखांपर्यंतची अतिरिक्त आर्थिक मदतही दिली जाऊ शकते. या निधीचा वापर महिलांना आपल्या पसंतीनुसार कृषी, पशुपालन, हस्तकला, शिवणकाम, विणकाम तसेच इतर लघुउद्योग सुरू करण्यासाठी करता येईल.Narendra Modi
ही योजना केवळ आर्थिक मदत पुरविण्यावर मर्यादित नसून, महिलांना स्वयं-सहायता गटांशी संलग्न सामुदायिक साधन व्यक्तींच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले जाईल. तसेच महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभरातील ‘ग्रामीण हाट-बाजार’ विकसित करण्यात येणार आहेत.
या योजनेच्या उद्घाटनावेळी राज्यभर जिल्हा, तालुका, क्लस्टर आणि गाव पातळीवर कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून, 1 कोटीहून अधिक महिला या कार्यक्रमाच्या साक्षीदार ठरणार आहेत.या उपक्रमामुळे बिहारमधील लाखो महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून, त्यांना आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक सबलीकरण मिळण्यास मोठी मदत होईल.
Prime Minister Narendra Modi launched the ‘Mukhyamantri Mahila Rozgar Yojana’ in Bihar too
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar पुणेकरांनी अडवली शरद पवारांची कार! आमची घरं वाचवा अशी केली मागणी
- भाजप पदाधिकाऱ्यांनी काँग्रसेच्या जेष्ठ पदाधिकार्याला घेरून जबरदस्तीने नेसविली साडी
- Supriya Sule : महाविकास आघाडीत बिघाडी ! सुप्रिया सुळे यांचे स्थानिक स्वराज्य संस्थांत वेगळे लढण्याचे संकेत
- भारतीय प्रेरणांनी लिहिणारे कालजयी साहित्यिक एस एल भैरप्पा यांचे निधन