विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Supreme Court पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर भारत–पाकिस्तान आशिया कप टी-20 सामना (१४ सप्टेंबर, दुबई) रद्द करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही याचिका उर्वशी जैन यांच्या नेतृत्वाखाली चार विधी विद्यार्थ्यांनी दाखल केली असून, सामना खेळणे म्हणजे देशाचा सन्मान कमी करणे आणि शहीद जवानांच्या बलिदानाचा अवमान करणे असल्याचा मुद्दा मांडण्यात आला आहे.Supreme Court
याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणे हा देशाच्या नागरिकांच्या सुरक्षिततेशी आणि भारतीय सैनिकांच्या शौर्याशी केलेला थेट अपमान आहे. “राष्ट्रीय हित, देशाचा सन्मान आणि जवानांचे बलिदान यापेक्षा क्रिकेट मोठे नाही,” असा युक्तिवाद करण्यात आला आहे.
या याचिकेत २०२५ च्या राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही याचिका अधिवक्ता स्नेहा राणी, अभिषेक वर्मा आणि मोहम्मद अनस चौधरी यांच्या मार्फत दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे क्रीडा विश्व आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Public interest litigation filed in Supreme Court demanding cancellation of India-Pakistan match after Pahalgam terror attack
महत्वाच्या बातम्या
- Vice Presidential election : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांना दणका; तब्बल 30 मते फुटली !
- Ayush Komkar murder case : आयुष कोमकर हत्या प्रकरण; बंडू आंदेकरसह 8 जण अटकेत
- double-decker buses : आता पुण्यातही धावणार डबल-डेक्कर बस?
- Pune Commissioner : पुण्यातील रखडलेल्या प्रकल्पांबाबत आयुक्त घेणार मुख्यमंत्र्यांची भेट!