विशेष प्रतिनिधी
रांची : Jharkhand Mukti Morcha झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) या झारखंडमधील सत्ताधारी पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीत भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने हा निर्णय घेत, राजद (RJD) आणि काँग्रेसवर “राजकीय कट रचल्याचा” गंभीर आरोप केला आहे.Jharkhand Mukti Morcha
महागठबंधनातील या तीन पक्षांनी बिहारमध्ये एकत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, झारखंड मुक्ती मोर्चाने आरोप केला आहे की राजद आणि काँग्रेसने जाणूनबुजून त्यांना एकही जागा न देता बाहेर ठेवले. पक्षाने याला “राजकीय षडयंत्र” असे म्हटले आहे.Jharkhand Mukti Morcha
गेल्या शनिवारीच झारखंड मुक्ती मोर्चाने बिहारमधील सहा जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. चकाई, धमदाहा, कटोरिया, मनीहारी, जमुई आणि पिरपैंती या त्या जागा आहेत. मात्र, सोमवारी (२० ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस होता, आणि झारखंडमुक्ती मोर्चाने कोणतेही उमेदवार न उभे करता माघार घेतली.Jharkhand Mukti Morcha
झारखंडचे पर्यटन मंत्री आणि झारखंडमुक्ती मोर्चाचे वरिष्ठ नेते सुदिव्य कुमार यांनी राजद आणि काँग्रेसवर “कट रचून आमच्याशी विश्वासघात केल्याचा” आरोप केला. “या अन्यायाला योग्य ते प्रत्युत्तर आम्ही देऊ,” असे ते म्हणाले.
कुमार यांनी स्पष्ट केले की, झारखंडमध्ये काँग्रेस आणि राजद हे झारखंड मुक्ती मोर्चाचे सत्तेतील भागीदार आहेत. पण या घटनेनंतर झारखंडमध्येही आघाडीचे समीकरण नव्याने पाहावे लागेल. “आम्ही या भागीदारीचा पुनर्विचार करू,” असा इशारा त्यांनी दिला.
झारखंडमुक्ती मोर्चाने जाहीर केले आहे की, ते बिहारमध्ये कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाहीत. तसेच, “महागठबंधनाने आम्हाला बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचे परिणाम त्यांनाच भोगावे लागतील,” असा इशाराही पक्षाने दिला आहे.
या निर्णयामुळे बिहारमधील महागठबंधनात तणाव निर्माण झाला असून, झारखंडपर्यंत त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
RJD-Congress conspired against us, denied us seats’; Jharkhand Mukti Morcha decides not to contest Bihar elections, will also reconsider alliance in Jharkhand
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात शिंदे – ठाकरे गटाचे नेते साथ साथ, रवींद्र धंगेकर यांना वसंत मोरेंचा पाठिंबा
- व्हिजन डॉक्युमेंट साकारणार विकसित भारताचे स्वप्न : मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- तर सर्वांची धार्मिक स्थळे अशीच लाटली जातील, जैन बोर्डिंग प्रकरणावरून रवींद्र धंगेकर यांचा इशारा
- औरंगजेबाच्या कबरीजवळ दिवा लावून दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस घ्या..