Mohan Bhagwat : काशी, मथुरा आंदोलनात संघ थेट सहभागी होणार नाही, सरसंघचालकांनी स्पष्ट केली भूमिका

Mohan Bhagwat : काशी, मथुरा आंदोलनात संघ थेट सहभागी होणार नाही, सरसंघचालकांनी स्पष्ट केली भूमिका

Mohan Bhagwat

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Mohan Bhagwat  राम मंदिराचे आंदोलन हे एकमेव होते ज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने थेट सहभाग घेतला होता असे सांगत काशी, मथुरा आंदोलनात संघ थेट सहभागी होणार नाही. मात्र स्वयंसेवक अशा कोणत्याही मोहिमेत सामील होण्यास स्वतंत्र आहेत, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सत्संगचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केले आहे.Mohan Bhagwat

सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, “राम मंदिर ही अशी एक चळवळ होती ज्याला संघाने पाठिंबा दिलेला. संघ अन्य कोणत्याही आंदोलनात सहभागी होणार नाही. संघ काशी-मथुरामधील चळवळींना पाठिंबा देणार नाही, परंतु आमचे स्वयंसेवक त्यात सहभागी होऊ शकतात.” मोहन भागवत यांच्या या विधानाकडे संघाच्या भविष्यातील रणनीतीचा एक भाग समजले जात आहे. कारण आतापर्यंत या दोन्ही प्रकरणात संघ सकिरी भूमिका घेईल असे वाटत होते.Mohan Bhagwat


सरसंघचालक मोहन भागवत यांनी या कार्यक्रमात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत देखील भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपसाठी रिमोट कंट्रोल म्हणून कार्यरत आहे ही धारणा त्यांनी नाकारली. ते म्हणाले, “आम्ही निर्णय घेत अस्टो तर इतका वेळ लागला असता का? संघाचे काम फक्त सूचना देण्याचे आहे. अंतिम निर्णय घेणे हे पक्षाचे काम आहे. संघ शाखा चालवण्यात तज्ज्ञ आहे, त्याचप्रमाणे भाजप सरकार चालवण्यात तज्ज्ञ आहे. दोघेही एकमेकांचा आदर करतात.

मोहन भागवत म्हणाले की, भारतातील प्रत्येक नागरिकाने किमान तीन अपत्ये जन्माला घालावीत. मोहन भागवत म्हणाले की, ‘जन्मदराच्या बाबतीत तुम्ही हा प्रश्न प्रचारकाला विचारू नये, पण आता विचारला आहे तर मी उत्तर देतो.’ ते म्हणाले की, जगात सर्व शास्त्रे सांगतात की, ज्या समाजाचा जन्मदर ३ पेक्षा कमी असतो, तो हळूहळू लुप्त होतो. त्यामुळे तीनपेक्षा जास्त जन्मदर राखणे आवश्यक आहे.

RSS to Stay Away from Kashi and Mathura Agitations, Says Chief Mohan Bhagwat

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023