विशेष प्रतिनिधी
मुंबई : अमेरिकेतील उद्योगपती गौतम अदानी आणि इतरांवरील लाचखोरीच्या आरोपांबाबात न्यूयॉर्कच्या कोर्टाने सर्व तीन प्रकरणांची एकाचवेळी सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे अदानी यांच्या कंपन्यांचे शेअर कोसळले आहेत.
न्यायालयाने दिलेल्या आदेशात तिन्ही प्रकरणांची एकत्रित सुनावणी एकाच न्यायालयात करावी, असे म्हटले होते. तिन्ही प्रकरणे एकच आरोप आणि व्यवहारांशी संबंधित असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला. नंतर तिन्ही खटले एकाच न्यायालयाकडे सोपवण्यात आले.
कोणत्याही प्रकारचा संघर्ष होऊ नये म्हणून ही प्रकरणे एकाच न्यायाधीशासमोर ठेवण्यात आली आहेत. अदानी समूहाविरुद्ध लाचखोरीच्या आरोपांशी संबंधित दिवाणी आणि फौजदारी खटला यूएस जिल्हा न्यायाधीश गारोफिस यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
या खटल्यांची सुनावणी एकत्रितपणे केली जाईल. याचा सरळ अर्थ असा की, दिवाणी आणि फौजदारी खटल्यांची सुनावणी करून तेच न्यायालय आदेश जारी करेल.
यूएस जस्टिस डिपार्टमेंटच्या प्रवक्त्याने सांगितले की, यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनसमोर दाखल करण्यात आलेला दिवाणी खटला आणि न्यूयॉर्कच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्टसमोर दाखल करण्यात आलेला फौजदारी खटला आता न्यायाधीशांकडे सोपवण्यात आला आहे. परंतु दोन्ही प्रकरणांचे एकत्रीकरण झालेले नाही.
नोव्हेंबरमध्ये अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर अमेरिकन वकिलांनी लाचखोरीचा आरोप केला होता. या वृत्तानंतर शेअर बाजारात अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण सुरू झाली आहे.
Shares of Gautam Adani companies fell as the hearing started in America
महत्वाच्या बातम्या
- South Korea दक्षिण कोरियात 181 जणांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात, 28 ठार; लँडिंग गिअर बिघडले, धावपट्टीवर स्फोट
- Goa : गोवा बनावटीची 31 लाख रुपयांची दारू जप्त
- उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना उडवलं, एकाचा मृत्यू
- Suresh Dhas : प्राजक्ता माळी विषय संपलाय, मी माफी मागणार नाही, सुरेश धस यांनी केले स्पष्ट