विशेष प्रतिनिधी
ढाका : Sheikh Hasina गेल्या वर्षी बांग्ला देशात आंदोलनावेळी मानवतेविराेधात गंभीर गुन्हे केल्याचा ठपका ठेवत माजी पंतप्रधान शेख हसिनी यांना लवादाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. निशस्त्र आंदाेलकांवर गाेळीबार करण्याचे तसेच बाॅम्ब टाकण्याचे आदेश त्यांनी दिल्याचे म्हटले आहे.Sheikh Hasina
तीन न्यायाधीशांचा समावेश असलेल्या या लवादाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायमूर्ती गुलाम मुर्तझा यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायाधीशांच्या लवादाने शेख हसीना यांच्याविरोधातील हा निकाल सहा भाग आणि ४०० पानांमधून दिला आहे.बांगलादेशमध्ये २०२४ साली जून ते ऑगस्ट महिन्यादरम्यान, विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन झालं होतं. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी शेख हसीना यांनी दिलेल्या आदेशांमुळे अनेक निरपराध आंदोलकांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला होता.Sheikh Hasina
हे आंदोलक निवासस्थानापर्यंत पोहोचल्यानंतर शेख हसीना ह्या देश सोडून भारतात आश्रयाला आल्या होत्या. तेव्हापासून त्या भारतामध्ये विजनवासात राहत आहेत.दरम्यान, या प्रकरणात झालेल्या मृत्यूंसाठी शेख हसीनाच दोषी होत्या, हे कोर्टाने मान्य केले आहे. फिर्यादी पक्षाने सादर केलेले पुरावेही कोर्टाने लोकांसमोर ठेवले. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणाने शेख हसीना यांच्या विरोधात तब्बल ४५८ पानांचा निकाल दिला आहे. शेख हसीना जानेवारी २०२४च्या निवडणुकीनंतरच हुकूमशाह बनण्याच्या मार्गावर होत्या.
त्यांनी जानेवारी २०२४च्या निवडणुकीत विरोधी पक्षाला चिरडले. यानंतर जेव्हा विद्यार्थी रस्त्यावर उतरले, तेव्हा त्यांच्यावर गोळ्या झाडण्याचे आदेश दिले गेले.या हत्या प्रकरणात बांगलादेश सरकारने पदच्युत पंतप्रधान शेख हसीना, माजी गृहमंत्री असदुज्जमां खान कमाल आणि माजी पोलीस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल-मामून यांना आरोपी बनवले होते. तसेच बांगलादेशमधील आंतरराष्ट्रीय कोर्टात या तिघांविरुद्ध खटला सुरू असताना, माजी पोलीस महानिरीक्षक अल-मामून माफीचे साक्षीदार बनलेअल-मामून यांनी हसीना यांच्या विरोधात साक्ष देण्याचे मान्य केले.
हसीना यांचा एक ऑडिओ समोर आला, ज्यात त्या पोलीस प्रमुखांशी बोलत होत्या. या ऑडिओची सत्यता सिद्ध होताच हसीना यांच्याविरुद्धच्या खटल्याची सुनावणी वेगाने सुरू झाली आणि कोर्टाने त्यांना दोषी ठरवले. त्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.
Former Bangladesh Prime Minister Sheikh Hasina sentenced to death, found guilty of serious crimes against humanity
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…



















