विशेष प्रतिनिधी
सांगली : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार ओपनर स्मृती मानधना हिच्या घरी सध्या लग्नाचा जल्लोष पाहायला मिळतोय. तिच्या लग्नाच्या तयारीला सांगलीत जोर आला असून घरात नातेवाईक, मित्रमैत्रिणींची लगबग सुरू आहे.
स्मृतीची खास मैत्रिणी आणि टीममेट जेमिमा रॉड्रिग्ज हिने सोशल मीडियावर टाकलेला एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत जेमिमा, हरलीन देओल, पूजा वस्त्राकर यांसह टीममेट्सने ‘मुन्ना भाई M.B.B.S.’ मधील गाण्यावर भन्नाट डान्स करत सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले.
व्हिडिओच्या क्लायमॅक्समध्ये स्मृती मानधना हसत-हसत आपली एंगेजमेंट रिंग दाखवताना दिसते आणि मजेत म्हणते,“समझो हो ही गया!” यावरून स्मृतीच्या साखरपुड्याची पुष्टी झाल्याचे चर्चेला आणखी जोर आला आहे. कुटुंबीयांनीही सांगलीत सध्या तयारी वाढल्याचे कबूल केले आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असून फॅन्सकडून कमेंट्सचा महापूर आला आहे. “कधी आहे लग्न?”, “वर कोण?”, “टीम इंडियाचा पुढचा मोठा सेलिब्रेशन” अशा प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
जेमिमाने टाकलेल्या व्हिडिओत सजलेले घर, नाचणाऱ्या टीममेट्स, हातात मेहंदीसाठी ठेवलेली कोन, आणि पारंपरिक वेस्टर्न फ्यूजन कपड्यांतील स्मृती असे एकदम उत्सवी वातावरण दिसते.
Smriti Mandhana is preparing for her wedding; Lagbag started in Sangli, teammates’ viral dance
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : प्रो बैलगाडा लीग सुरू करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घाेषणा
- Sharad Pawar : काॅंग्रेसला ठाकऱ्यांचा नकाे हात, शरद पवारांची घेणार साथ
- संविधानिक संस्थांवर काँग्रेसच्या हल्ल्यांचा निषेध, २७२ माजी अधिकारी व न्यायमूर्तींचे खुले पत्र
- सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य, नाेटिफिकेशन काढण्यासाठी थांबण्याचे न्यायालयाचे निर्देश



















