Kamal Haasan : तामिळ माझे जीवन, माझे अस्तित्व, कमल हसन यांचा कन्नड भाषेवरील वक्तव्यावर माफी मागण्यास ठाम नकार

विशेष प्रतिनिधी

चेन्नई : Kamal Haasan ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी न्यायालयाने फटकारल्यानंतरही कन्नड भाषेबाबत वक्तव्यावर माफी मागण्यास नकार दिला आहे. तामिळ माझे जीवन, माझे अस्तित्व अ्रसल्याचे त्यांनी सांगितले.Kamal Haasan

अभिनेते कमल हासन त्यांच्या आगामी ठग लाइफ या सिनेमामुळे चर्चेत आहेत. या फिल्म प्रमोशनवेळी कन्नड भाषेबाबत कमल हासन यांनी केलेले विधान वादात सापडले. कन्नड भाषेचा जन्म तामिळ भाषेतून झाल्याचं कमल हासन यांनी म्हटले हाेते. कर्नाटकात कमल हासन यांचा जोरदार विरोध करण्यात आला. कमल हासन यांचा हा वाद कोर्टापर्यंत पोहचला. कोर्टानेही कमल हासन यांना फटकारले. परंतु कन्नड भाषेवर केलेल्या विधानावर कमल हासन यांनी माफी मागण्यास नकार दिला. आता चेन्नईत झालेल्या पत्रकार परिषदेतही कमल हासन आपल्या विधानावर ठाम राहिले. त्यांनी स्पष्टपणे माफी मागणार नाही असं सांगत तामिळ अस्तित्वाचा उल्लेख केला.

कर्नाटक उच्च न्यायालयात न्यायमूर्ती एम. नागाप्रसन्ना यांच्या खंडपीठाने अभिनेत्याला फटकारले आणि म्हटलं की, तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, पण भावना दुखावण्याचा नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही बोलू शकत नाही. आम्ही आता ते तुमच्यावर सोडत आहोत. जर तुम्ही कोणाला दुखावले असेल, तर माफी मागा. कर्नाटकातून करोडो कमवता येतात. जर तुम्हाला कन्नड लोकांची गरज नसेल, तर येथून कमवणे थांबवा अशा शब्दात न्यायालयाने त्यांना फटकारले. मात्र कमल हासन यांनी माफी मागण्यास नकार दिला. कमल आणि मणिरत्नम यांचा ठग लाइफ सिनेमा ५ जूनला कर्नाटक वगळता देशभरात प्रदर्शित होणार आहे.

Tamil is my life, my existence, Kamal Haasan’s firm refusal to apologize for his statement on Kannada language

महत्वाच्या बातम्या