विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: PM Modi टॅरिफ वादावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चार वेळा फोन केला, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद टाळला, असा दावा एका जर्मन मासिकाने केला आहे.PM Modi
जर्मन मासिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार वेळा फोन केला, पण मोदींनी त्यांच्याशी बोलणे टाळले. या दाव्यानंतर दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये तणाव असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.PM Modi
जर्मनीतील एका प्रतिष्ठित मासिकाने (FAZ) दिलेल्या वृत्तानुसार, टॅरिफच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी मोदींशी चार वेळा फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. जर ही बातमी खरी असेल, तर ट्रम्प यांच्या दबावाखाली न झुकणारे मोदी हे एकमेव जागतिक नेते ठरले आहेत. मात्र, या प्रकरणावर दोन्ही देशांच्या सरकारांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.PM Modi
यापूर्वीही पंतप्रधान मोदींनी अशाच प्रकारे अमेरिकेच्या नेत्यांशी संवाद टाळल्याची घटना घडली होती. पाकिस्तानसोबतच्या संघर्षाच्या वेळी, ९ मे च्या रात्री, अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीने ३-४ वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्या वेळी लष्कराच्या बैठकांमध्ये व्यस्त असल्याने मोदींनी त्यांचा फोन घेतला नव्हता, असे त्यांनी लोकसभा निवडणुकीत सांगितले होते.
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये आल्यापासून भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधात तणाव दिसून येत आहे. ट्रम्प प्रशासनाने भारतावर २५% टॅरिफ लावला आहे. तसेच, रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे अतिरिक्त २५% टॅरिफ लावण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधात दुरावा निर्माण झाल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, दोन्ही देशांमध्ये टॅरिफ वादावर चर्चा सुरू असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.
Trump called 4 times, but PM Modi avoided the conversation? German magazine claims
महत्वाच्या बातम्या
- किती माजलाय तो जरांग्या, भाषा मग्रुरीची : गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबाेल
- मंत्र्याला काढण्याची घटनेतच तरतूद तर घटना दुरुस्ती कशासाठी, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
- न्यायदेवता अन्याय करणार नाही, मुंबईत जाणारच : मनाेज जरांगेंचा निर्धार
- एकेरी भाषा, आयाबहिणींवर अपशब्द खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाेज जरांगेंना इशारा