विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: Trump’s रशियन तेल खरेदीवर हे वेडेपण आहे असे म्हणत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांनी पुन्हा एकदा भारताच्या व्यापार धोरणांवर आणि रशियन तेल खरेदीवर टीका केली आहे.Trump’s
नवारो म्हणाले, “युद्ध सुरू झाल्यानंतर लगेच भारतीय रिफायनर रशियन रिफायनरसोबत हातमिळवणी करत होते. हे वेडेपण आहे, कारण ते आमच्याकडून अन्यायकारक व्यापारातून पैसा कमावतात आणि त्याच पैशातून रशियन तेल घेतात. रशिया मग त्या पैशातून शस्त्रे खरेदी करतो.”Trump’s
ही टीका अमेरिकेचे प्रमुख वाटाघाटी अधिकारी ब्रेंडन लिंच भारताच्या दौऱ्यावर येत असतानाच करण्यात आली. लिंच हे सोमवारी रात्री (१५ सप्टेंबर) भारतात दाखल झाले असून, ते भारताचे प्रमुख प्रतिनिधी राजेश अग्रवाल यांच्याशी चर्चा करणार आहेत.Trump’s
अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार कराराच्या चर्चेला ऑगस्टच्या अखेरीस ब्रेक लागला होता. कारण अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर २५ टक्के दंडात्मक टॅरिफ लावले होते. त्यानंतर रशियन तेल खरेदीच्या कारणावरून आणखी २५ टक्के टॅरिफ २७ ऑगस्टपासून लागू करण्यात आले.
या निर्णयाचा थेट परिणाम भारतीय निर्यातीवर झाला असून, ऑगस्टमध्ये अमेरिकेकडे जाणारी निर्यात ६.८६ अब्ज डॉलर इतकी झाली, जी जुलै महिन्यातील ८.०१ अब्ज डॉलर पेक्षा कमी आहे.
भारताने अमेरिकेला कृषी आणि दुग्धोत्पादन क्षेत्र खुले करण्यास नकार दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे की शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणे ही सरकारची प्राथमिकता असेल. त्यामुळे या रेड लाईन्स आगामी चर्चेत प्रमुख ठरणार आहेत.
मार्च-एप्रिलपासून सुरू असलेल्या या चर्चेत पहिला टप्पा सप्टेंबरमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले होते. मात्र आता हे लक्ष्य ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत ढकलण्यात आले आहे. दोन्ही देशांनी चर्चेला गती देण्याचे ठरवले असून, लिंच यांचा हा एकदिवसीय दौरा त्याच दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.
Trump’s advisor again targets India, saying it’s madness
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा