विशेष प्रतिनिधी
पाटणा : भारतीय जनता पक्षाचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांची शिष्टाई यशस्वी झाली असून आगामी बिहार विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) अखेर आसनवाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. १२ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आला. या निवडणुका ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यांत होणार आहेत. Vinod Tawde
आघाडीच्या सूत्रांनुसार, भाजप (BJP) आणि जनता दल (युनायटेड) [JD(U)] प्रत्येकी १०१ जागांवर, तर लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) [LJP(RV)] चे प्रमुख चिराग पासवान यांच्या पक्षाला २९ जागा मिळाल्या आहेत. हिंदुस्तानी अवाम मोर्चा (सेक्युलर) [HAM(S)] चे नेते व केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी आणि राष्ट्रीय लोक मोर्चा (RLM) चे प्रमुख उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षांना प्रत्येकी ६ जागा देण्यात आल्या आहेत.
एकूण २४३ सदस्यीय बिहार विधानसभेसाठी हा फॉर्म्युला लागू होईल.
हम(से) ने आपल्या विद्यमान चार मतदारसंघ — इमामगंज, टेकरी, सिकंदरा आणि बराचट्टी — कायम ठेवले असून, याशिवाय अत्री आणि कुटुंबा या दोन नवीन मतदारसंघांवरही ते लढणार आहेत. RLM ला ओबरा, सासाराम, मधुबनी, बाजपट्टी, नरकटिया, दुम्राव आणि महुआ या सहा जागा देण्यात आल्या आहेत. Vinod Tawde
मात्र, कुशवाहा यांनी सिवान, सारण, उजियारपूर आणि गोह या मतदारसंघांची मागणी केली होती, ती भाजपने मान्य केलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
एनडीएतील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी ट्विटर (X) वर एकसमान संदेश देत एकजुटीचा संदेश दिला.
जेडीयूचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय कुमार झा, भाजपचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, उपेंद्र कुशवाहा आणि चिराग पासवान यांनी लिहिले —“आम्ही एनडीए सहयोगी पक्षांनी एकत्र येऊन जागावाटपाचे निर्णय आपुलकीच्या वातावरणात घेतले आहेत. सर्व कार्यकर्ते आणि नेते या एकमताने झालेल्या निर्णयाचे स्वागत करत आहेत.
या फॉर्म्युल्यापूर्वी भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांनी मांझी आणि त्यांचा पुत्र संतोष सुमन यांच्यासह झालेल्या चर्चेत निर्णायक भूमिका बजावली. त्यानंतर कुशवाहांच्या राष्ट्रीय लोक मोर्चा (RLM) सोबतही अंतिम करार करण्यात आला.
Vinod Tawde’s Diplomacy Pays Off: NDA Finalizes Seat-Sharing Formula for Bihar Assembly Elections
महत्वाच्या बातम्या
- Cooperation Minister, : लोकांना कर्जमाफीचा नाद, सहकार मंत्र्यांच्या असंवेदनशील विधानावर संताप, म्हणण्याचा अर्थ ताे नव्हता असा खुलासा
- Nitesh Rane : एमआयएमच्या नावाखाली हिरव्या सापांची वळवळ, पुन्हा सभा हाेऊ द्यायची का विचार करू, नितेश राणेंचा इशारा
- Ajit Pawar : तुम्हाला पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाही, गैरप्रकार करणाऱ्यांना अजित पवार यांचा इशारा
- महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीत रंगणार ‘पवार विरुद्ध मोहोळ’ सामना