मुंबईच्या प्रारूप मतदार यादीत 11 लाख दुबार मतदार, डॉ. ज्योती गायकवाड यांचा आरोप

मुंबईच्या प्रारूप मतदार यादीत 11 लाख दुबार मतदार, डॉ. ज्योती गायकवाड यांचा आरोप

Dr Jyoti Gaikwad

विशेष प्रतिनिधी

मुंबई: मुंबईच्या प्रारूप मतदार यादीत 11 लाख दुबार मतदार आहे. या प्रचंड संख्येतील पुनरावृत्ती मुळे निवडणूक प्रक्रियेचा पारदर्शकपणा धोक्यात येऊ शकतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एवढ्या प्रमाणात दुबार नावे नक्की कोणासाठी ठेवली गेली, याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे, अशी मागणी काँग्रेसच्या आमदार डॉ. ज्योती गायकवाड यांनी केली आहे. Dr Jyoti Gaikwad

ज्योती गायकवाड यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईच्या पश्चिम उपनगरात सर्वाधिक दुबार मतदार आढळून आले असून त्यांची संख्या 4 लाख 98 हजार 597 इतकी आहे. पूर्व उपनगरात 3 लाख 29 हजार 216 मतदारांची पुनर्नोंदणी तर शहर विभागात 2 लाख 73 हजार मतदारांची दुबार नोंद झाली आहे. काही ठिकाणी तर एका मतदाराचे नाव दोनपेक्षा जास्त वेळा दिसत असल्याचा दावा त्यांनी केला. स्थानिक निवडणुकांमध्ये काही मतांचे अंतर निर्णायक ठरू शकते. अशा परिस्थितीत लाखो दुबार मतदार असणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. काँग्रेस या मुद्यावर लढण्यासाठी तयार असून न्याय्य निवडणुका व्हाव्यात यावर त्यांनी भर दिला. Dr Jyoti Gaikwad



दुसरीकडे, विरोधी पक्षांनीही याच मुद्द्यावर प्रशासन आणि निवडणूक आयोगावर दबाव वाढवला आहे. त्यांनी मागणी केली आहे की, दुबार नावे पूर्णपणे हटवल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत निवडणुका घेऊ नयेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेळापत्रक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारी 2026 पूर्वी जाहीर व्हायचे आहे. अनेक महापालिका आणि नगरपालिका सध्या प्रशासनाच्या ताब्यात आहेत. कोरोनामुळे आणि आरक्षणाच्या वादामुळे निवडणुका बराच काळ रखडल्या. त्यामुळे यावेळी निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असावी, अशी मागणी विरोधकांनी अधिक तीव्र केली आहे. Dr Jyoti Gaikwad

दरम्यान, नगर पंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून 31 ऑक्टोबर 2025 पर्यंतची मतदार यादी यासाठी लागू असणार आहे. या निवडणुकीत राज्यातील 1 कोटी 7 लाख मतदार भाग घेणार असून 13 हजार 355 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, मतदारांना मतदान केंद्र आणि स्वतःचे नाव तपासण्यासाठी नवीन मोबाईल ॲपही उपलब्ध करून देण्यात आले आहे. मतदारांना स्वतःची नोंद पडताळता यावी आणि गोंधळ कमी व्हावा, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ही आधुनिक सुविधा उपलब्ध केली आहे.

http://youtube.com/post/UgkxwjPNS5N4e1S9wDQpM5N8fvJV85LbzPx4?si=EI_9Y4u14T8SCF58

11 Lakh Duplicate Voters in Mumbai Draft Roll, Alleges Dr Jyoti Gaikwad

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023