विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी आणि पूरबाधितांना मदत देण्याची घोषणा केल्यानंतर मदतीचे दर आणि निकषांचा शासन निर्णय गुरुवारी (प्रसिद्ध केला.परंतु या शासन निर्णयात विविध आपत्तीग्रस्त जिल्हे आणि तालुक्यांचा समावेश केला नाही. त्यामुळे राज्यभरात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर राज्य सरकारने सुधारित शासन निर्णय प्रसिद्ध करून २९ तालुक्यांचा नव्याने समावेश केला आहे. यामध्ये अंशत:बाधित आणि पूर्णत:बाधित असे वर्गीकरण केले आहे. तसेच अंशत बाधित तालुक्यातील प्रत्यक्ष बाधित मंडळांना सवलती मिळणार असल्याचे राज्य सरकारने शासन निर्णयात स्पष्ट केले आहे. Flood Relief Assistance
राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर २०२५ दरम्यान अतिवृष्टी, पूर यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालं. त्यामुळे पूर्णत: बाधित आणि अंशत बाधित तालुक्यांना राज्य सरकारने दुष्काळ सदृश्य परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्याचा निर्णय घेतल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
जमीन महसुलात सुट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती (एक वर्षासाठी), तिमाही वीज बिलात माफी, परीक्षा शुल्कात माफी व १० वी आणि १२ च्या विद्यार्थ्यांची फी माफी या पाच सवलती या बाधित तालुक्यांना देण्यात येणार आहेत. राज्य सरकार ९ सप्टेंबर रोजी शासन निर्णय प्रसिद्ध करून एनडीआरएफच्या निकषांनुसार मदतीचे दर आणि निकष जाहीर केले आहेत. तर रब्बीसाठी अनुदान स्वरूपात १० हजार रुपये प्रति हेक्टरी देण्याचा निर्णय घेतला आहे.
परंतु एनडीआरच्या जुन्याच दरानुसार मदत देण्यात येणार असून कोरडवाहूसाठी ८ हजार ५०० रुपये, बागायतसाठी १७ हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी २२ हजार ५०० रुपये याप्रमाणे दोन ऐवजी आता तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येणार आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या नुकसानीसाठी केवळ रब्बीसाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपये वाढीव मदत मिळणार आहे. तसेच पशुधन, झोपडी, गोठा, जमीन, घर आणि मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना एनडीआरच्या दरानुसार मदत मिळणार आहे.
राज्य सरकारने ९ ऑक्टोबरच्या यादीत ३१ तालुक्यातील २५३ तालुक्यांचा समावेश केला होता. परंतु राज्य सरकारने १० ऑक्टोबरच्या यादीत २९ तालुक्यातील २८२ तालुक्यांचा समावेश केला आहे. यापैकी ३१ तालुके अंशत बाधित आहेत. तर २५१ तालुके पूर्णत: बाधित आहेत.
जिल्हावारअंशत बाधित तालुके :
नाशिक – कळवण, देवळा, इगतपुरी
धुळे- धुळे, साक्री, सिंदखेडा
अहिल्यानगर- पारनेर, संगमनेर, अकोले,
पुणे- हवेली, इंदापूर
सांगली- कडेगाव
सातारा- सातारा, कराड, पाटण, फलटण, जावळी
कोल्हापूर- कागल, शिरोळ, पन्हाळा
बुलढाणा- नांदुरा, संग्रामपूर
गोंदिया- तिरोडा, गोंदिया, गोरेगाव, मोरअर्जुनी, सालेकसा, सडक अर्जुनी, आमगाव
गडचिरोली- चारमोशी, कोरची
29 More Talukas in the State Newly Included for Flood Relief Assistance
महत्वाच्या बातम्या
- Cooperation Minister, : लोकांना कर्जमाफीचा नाद, सहकार मंत्र्यांच्या असंवेदनशील विधानावर संताप, म्हणण्याचा अर्थ ताे नव्हता असा खुलासा
- Nitesh Rane : एमआयएमच्या नावाखाली हिरव्या सापांची वळवळ, पुन्हा सभा हाेऊ द्यायची का विचार करू, नितेश राणेंचा इशारा
- Ajit Pawar : तुम्हाला पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाही, गैरप्रकार करणाऱ्यांना अजित पवार यांचा इशारा
- महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीत रंगणार ‘पवार विरुद्ध मोहोळ’ सामना