विशेष प्रतिनिधी
बस्तर : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील इंद्रावती राष्ट्रीय उद्यानात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे दोन जवान आणि ३१ माओवादी ठार झाले आहेत. नक्षलवादी चळवळीला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. Chhattisgarh
गेल्यात काही दिवसांपासून छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाकडून नक्षलवाद्यांवर कारवाई केली जात आहे. त्यातच आज छत्तीसडगडमधील विजापूर आणि नारायणपूरला लागून असलेल्या महाराष्ट्र सीमेवर आज सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.
अबुझमाडला लागून असलेले राष्ट्रीय उद्यानाचा हा भाग माओवाद्यांसाठी एक सुरक्षित आश्रयस्थान असल्याचे मानले जाते. २७९९.०८ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले हे उद्यान महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. १९८३ मध्ये त्याला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले होते.उद्यानामध्ये एका भागात माओवाद्यांच्या असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईदरम्यान ही चकमक घडली.बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी दिलेल्या माहितीनुसार या चकमकीत शहीद झालेले जवान डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह गार्ड आणि स्पेशल टास्क फोर्सचे होते. ज्यांचा माओवादविरोधी कारवायांमध्ये तज्ज्ञ असलेल्या राज्यस्तरीय दलामध्ये समावेश होता.
चार जवान जखमी झाले असून त्यांना रायपूर येथे उपचारासाठी दाखल करण्याकरिता हेलिकॉप्टर पाठवण्यात येत असल्याचेही अधिकार्यांनी यावेळी सांगितले.
बस्तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत ठार झालले्या नक्षलवाद्यांची संख्या जास्त असू शकते. सध्या या परिसरात शोधमोहीम सुरु आहे. या चकमकीच्या ठिकाणी अनेक स्वयंचलित शस्त्रे सापडली असून ती जप्त करण्यात आली आहेत.
इद्रावती राष्ट्रीय उद्यानात झालेली या वर्षातील ही दुसरी चकमक आहे. यापूर्वी येथे १२ जानेवारी रोजी तीन माओवाद्यांना चकमकीत ठार करण्यात आले होते.
या वर्षात आतापर्यंत ६२ माओवाद्यांना चकमकीत ठार करण्यात आले आहे, तर छत्तीसगडमध्ये माओवाद्यांशी लढताना ११ जवानांनी देखील प्राण गमवावे लागले आहेत. तसेच या वर्षात बिजपूर येथील ५ जणांसह किमान ९ जणांची माओवाद्यांनी हत्या केली आहे.
बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी दिलेल्या माहीतनुसार, १ फेब्रुवारी २०२५ पर्यंत राज्यात वेगवेगळ्या चकमकीत ५० हून अधिक नक्षलवादी ठार झाले आहेत. राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांच्या वेगवेगळ्या चकमकीत 219 नक्षलवादी ठार झाले होते. नोव्हेंबर 2023 मध्ये छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर राज्यात नक्षलविरोधी मोहिमेला चांगलाच वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मार्च 2026 पर्यंत राज्य नक्षलमुक्त करण्याची घोषणा केली आहे.
31 Maoists killed in encounter in Chhattisgarh, encounter in Indravati National Park
महत्वाच्या बातम्या
- अंजली दमानिया यांच्यावर धनंजय मुंडे दाखल करणार फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला
- पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात, दिल्लीत आज मतदान
- Anjali Damania : अंजली दमानिया यांनी वाचला धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचा पाढा, कृषीमंत्री असताना दुपटीहून दराने खरेदी
- Supriya Sule : पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आश्वासन