विशेष प्रतिनिधि
कुडाळ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तोंडावर असतांनाच भाजपाने एक मोठा निर्णय घेतला आहे. कुडाळमधील नगराध्यक्षांसह सहा नगरसेवकांना भाजपाने घरचा रस्ता दाखवला आहे. पक्षविरोधी कामांमध्ये सहभाग दिसल्यामुळे ही कारवाई केल्याचं सांगण्यात येत आहे. Kudal
ही कारवाई भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केली आहे. निलंबित झालेल्या नगरसेवकांमध्ये नयन मांजरेकर, अभिषेक गावडे, विलास कुडाळकर, राजीव कुडाळकर, आणि चांदणी कांबळी यांचा समावेश आहे. त्यासोबतच या निलंबनामध्ये नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांचाही समावेश आहे.
निलंबनाचे कारण काय?
या निलंबनामागे, संबंधित नगरसेवकांनी पक्षाच्या शिस्तीचे उल्लंघन आणि पक्ष विरोधी कारवाया केल्याचे कारण दिले जात आहे. हे नगरसेवक गेल्या अनेक महिन्यांपासून पक्षाच्या अधिकृत बैठका आणि कार्यक्रमांमध्ये गैरहजर राहत होते. याशिवाय, ते इतर राजकीय पक्षांच्या व्यसपीठावरही दिसत होते. या गंभीर पक्षविरोधी वर्तनामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. Kudal
या निलंबनाबाबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जिल्हयाधिकाऱ्यांना लेखी पत्र दिले आहे. या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, निलंबित नगरसेवक हे भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते, परंतु आता ते पक्षविरोधी कामामध्ये सहभागी होतांना दिसतात. ही पक्षाच्या हिताच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याने यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा. संबंधित नगरसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई करून योग्य आदेश द्यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.
कुडाळमध्ये असणाऱ्या भाजपाच्या एकूण आठ नगरसेवकांपैकी केवळ दोन नगरसेवकांना या कारवाईतून वगळण्यात आले आहे. संध्या तेरसे आणि रामचंद्र परब अशी या दोन नगरसेवकांची नावे आहेत. ते ‘सिद्धिविनायक नगरविकास आघाडी’ या गटातून काम करत असल्याने त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. Kudal
दरम्यान, निलंबीत केलेल्या नगरसेवकांवर केवळ बैठक टाळणे किंवा पक्षाच्या कार्यक्रमांना गैरहजर राहणे एवढेच आरोप नाहीत, तर अधिकृत भूमिकेच्या विरोधात वक्तव्य करणे, प्रोटोकॉल मोडून बॅनरवर इतर नेत्यांचे फोटो प्रदर्शित करणे असे गंभीर आरोप देखील आहेत. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
मात्र, भाजपाच्या या अंतर्गत घडामोडींमुळे कुडाळ नगरपंचायतीच्या आगामी राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच या कारवाईचा आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर काय परिणाम होतो हे पहावे लागेल. सोबतच, निलंबित नगरसेवक आता दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार की आणखी कही पाउलं उचलणार हे पहाणं महत्वाचं ठरेल. Kudal
6 BJP corporators expelled from Kudal
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा