विशेष प्रतिनिधी
बीड : बीड जिल्ह्यात धूनकवड फाटा परिसरात आज दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात झाला. पवार धारूरवरून केजकडे जात असताना ताफा पुढे जात होता. त्याच वेळी अचानक एक दुचाकी समोर आल्याने ताफ्यातील पायलट वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील नवरा–बायको आणि दोन लहान मुलांसह चौघे गंभीर जखमी झाले. Ajit Pawar
स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने धारूर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. त्यापैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. आवश्यक ते उपचार सुरू असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा विचार सुरू आहे.Ajit Pawar
धडकेत ताफ्यातील एक सुरक्षा रक्षकही जखमी झाल्याचे समोर येते. त्यालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल कर ण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच धारूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली आणि पंचनामा सुरू केला.अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट नाही.
घटनास्थळी काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार ताफ्यासह सुरक्षित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेज मिळताच अपघाताचा नेमका क्रम स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
accident after being hit by a vehicle in Deputy Chief Minister Ajit Pawar’s convoy;.
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : प्रो बैलगाडा लीग सुरू करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घाेषणा
- Sharad Pawar : काॅंग्रेसला ठाकऱ्यांचा नकाे हात, शरद पवारांची घेणार साथ
- संविधानिक संस्थांवर काँग्रेसच्या हल्ल्यांचा निषेध, २७२ माजी अधिकारी व न्यायमूर्तींचे खुले पत्र
- सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य, नाेटिफिकेशन काढण्यासाठी थांबण्याचे न्यायालयाचे निर्देश



















