Ujjwal Nikam : वकील उज्वल निकम यांची राष्ट्रपतींनी राज्यसभा खासदार म्हणून नामनिर्देशित नियुक्ती

Ujjwal Nikam : वकील उज्वल निकम यांची राष्ट्रपतींनी राज्यसभा खासदार म्हणून नामनिर्देशित नियुक्ती

Ujjwal Nikam

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 26/11 मुंबई हल्ला, 1993 बॉम्बस्फोट, गुलशनकुमार हत्या आणि कोपर्डी बलात्कारासारख्या अनेक संवेदनशील खटल्यांमध्ये सरकारी विशेष वकील म्हणून ठसा उमठवणारे वरिष्ठ विधिज्ञ उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेसाठी नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड केली आहे.



भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 80 अंतर्गत, राष्ट्रपती विशिष्ट क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या व्यक्तींना राज्यसभेत नियुक्त करू शकतात. याच अंतर्गत उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना कायदाक्षेत्रातील कार्यगौरव म्हणून संसदेत स्थान देण्यात आले आहे. यासोबतच माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, इतिहासकार मीनाक्षी जैन, आणि समाजसेवक सी. सदानंदन मास्ते यांचाही समावेश आहे.

उज्वल निकम यांनी 2024 मध्ये उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती, परंतु त्यांचा पराभव काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी केला होता. निवडणुकीतील पराभवानंतर त्यांना राज्यसभेवर नामनिर्देशित करण्यात आले आहे.

उज्वल निकम यांनी आपल्या वकिली कारकिर्दीत अनेक प्रकरणांमध्ये कठोर शिक्षा सुनावण्यासाठी भूमिका बजावली आहे. न्यायप्रक्रियेचा दृढ पाठपुरावा, साक्षीदारांची मानसिक तयारी, आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळवून देणे यासाठी त्यांची ओळख आहे.

Advocate Ujjwal Nikam nominated as Rajya Sabha MP by President

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023