विशेष प्रतिनिधी
मुंबई : OBC मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेल्या जीआर मुळे मराठा बांधवांनी आंदोलन मागे घेतलेलं असलं तरी यामुळे ओबीसी समाजात मात्र तीव्र असंतोष पसरला आहे. या जीआरला ओबीसी नेत्यांकडून मोठा विरोध केला जात आहे. OBC
गणेशोत्सवाच्या काळात मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले होते. यात मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे यासह अन्य काही प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या होत्या. सरकारने यातील ६ मागण्या मान्य केल्या. यासंदर्भात सरकारने एक शासन निर्णय देखील जरी केला.
या जीआर मुळे ओबीसी आरक्षण धोक्यात येईल अशी भावना ओबीसी समाजामध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे ओबीसी समाजाने आता याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य सरकारने मराठा समाजाच्या हिताचा विचार करून निर्णय घेतला असला तरी तोडगा काढतांना ओबीसींच्या हककांवर गदा आली, असा आरोप या संघटनांकडून केला जात आहे. OBC
विशेषतः यासंदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिल्यामुळे हा संघर्ष आता अधिक तीव्र झाला आहे. केवळ न्यायालयात जाण्याचा इशाराच नाही तर, आता मराठा समाजाच्या आंदोलनानंतर ओबीसी समाजानेही मुंबईत महामोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. दसऱ्यानंतर 8 किंवा 9 ऑक्टोबर रोजी भव्य ओबीसी महामोर्चा आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भात मंत्री छगन भुजबळ लवकरच बैठक घेणार आहेत.
बैठक व छगन भुजबळांची भूमिका
आज ओबीसी समाजाच्या विविध संघटनांच्या नेत्यांची ऑनलाइन बैठक होणार आहे. या बैठकीत मोर्चाच्या तारखेवर अंतिम निर्णय घेण्यात येईल. प्राथमिक चर्चेनुसार, दसऱ्यानंतर लगेचच म्हणजे 8 किंवा 9 ऑक्टोबर रोजी मोर्चा काढण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या बैठकीला माजी उपमुख्यमंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ ऑनलाइन सहभागी होण्याची शक्यता आहे. भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे की, कुणबी प्रमाणपत्रामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात येणार असल्यास त्याचा तीव्र विरोध केला जाईल. त्यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात न्यायालयीन लढाई उभारण्याची देखील तयारी दर्शवली आहे. OBC
सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून आंदोलनाचा तात्पुरता तोडगा काढला असला तरी आता ओबीसी समाजाच्या असंतोषामुळे राज्यातील सामाजिक वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. मराठा व ओबीसी या दोन मोठया समाजघटकांच्या आरक्षणाच्या मागण्या आणि त्यावर होणारे निर्णय यामुळे महाराष्ट्रचे राजकारण व प्रशासन दोन्ही तणावाखाली आले आहे. दसऱ्यानंतर होणारा ओबीसी महामोर्चा किती मोठा प्रतिसाद मिळवतो? त्यानंतर सरकारची भूमिका काय असेल? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. OBC
After the Marathas, now OBCs are also marching to Mumbai?
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा