विशेष प्रतिनिधी
सोलापूर : Ajit Pawar in trouble : अधिकाऱ्यांना थेट फाेन लावून काम मार्गी लावण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कामाची स्टाईल आहे. मात्र, कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे अवैध कृत्यावर कारवाईसाठी गेलेल्या महिला आयपीएस अधिकाऱ्यालाच तंबी दिल्याचा व्हिडीओ कॉल व्हायरल झाल्याने अजित पवार अडचणीत सापडले आहेत.
माढा तालुक्यातील कुर्डू गावात अवैध मुरूम उत्खननाविरोधात कारवाईसाठी गेलेल्या करमाळा विभागाच्या पोलिस उपअधीक्षक अंजली कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील फोन संभाषण व व्हिडीओ कॉल प्रकरण सध्या जोरदार चर्चेत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कुर्डू गावात रस्त्यासाठी सुरू असलेल्या मुरूम उत्खननाच्या तक्रारीनंतर पोलिस उपअधीक्षक अंजली कृष्णा घटनास्थळी पोहोचल्या. यावेळी स्थानिक ग्रामस्थांसोबत त्यांची शाब्दिक चकमक झाली. या दरम्यान बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून कृष्णा यांच्या हातात दिला.
फोनवरून पवारांनी स्वतःची ओळख करून देत कारवाई थांबविण्याचे आदेश दिले. मात्र, अंजली कृष्णा यांनी त्यांचा आवाज ओळखला नाही. त्यावर पवारांनी नाराजी व्यक्त करत ‘मैं डीसीएम अजित पवार बोल रहा हु. कारवाई बंद करो, मेरा आदेश है’ असे सांगितले.कृष्णा यांनी ‘मेरे फोन पर कॉल करो’ असे उत्तर दिल्यावर पवार अधिकच संतापले. तुम पे अॅक्शन लुंगा, इतनी डेरिंग है तुम्हारी. मेरा चेहरा तो पहचानोगी ना..’ असे म्हणत त्यांनी तात्काळ व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉल आल्यानंतर अंजली कृष्णा थेट बांधावर बसून पवारांशी संवाद साधताना दिसतात. या संभाषणात पवारांनी कारवाई थांबविण्याचे निर्देश दिल्याचे स्पष्ट ऐकू येते. माझा फोन आलाय तहसीलदारांना सांगा असेही ते म्हणताना दिसतात.
करमाळ्यातील शेतकरी संघटनेचे नेते अतुल खुपसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. एक महिला आयपीएस अधिकारी बेकायदेशीर मुरुम उपसा करणाऱ्यावर कारवाई करायला जाते. अजित पवारांचे कार्यकर्ते वेढा टाकतात आणि अजितदादांना फोन करतात. यावेळी अजित पवार बोलतात तुझी दादागिरी झाली, तुझ्यावर कारवाई करेन. म्हणजे एका बाजूने लाडकी बहीण योजना आणता दुसरीकडे आपल्या मुलीच्या वयासारख्या असणाऱ्या महिला अधिकाऱ्याला दम दिला जातो, असा आरोप खुपसे यांनी केला.
Ajit Pawar in trouble due to viral video call, even the female IPS officer who went for action was harassed
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा