विशेष प्रतिनिधी
बारामती : कुणी कुठेतरी लाईन मारायला जाल तर तुझी लाईनच काढतो अन् टायर खाली घेतो. कुणालाही अजिबात कोणाला सोडणार नाही. कायदा हातात घेऊ नका. बाबासाहेबांनी संविधान आणि कायदा समाजाच्या भल्यासाठी दिला आहे, असा सज्जड दम बारामतीतील टवाळक्या करणाऱ्या तरुणांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
अजित पवार म्हणाले, बारामतीमध्ये जर कुणी कायदा सुव्यवस्था राखणार नसेल तर त्याला योग्य तो धडा शिकवा, बारामतीची बदनामी आजिबात खपवून घेणार नाही असा दम उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला. यूपी-बिहारमधून कुणीतरी येतो, आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करतो, ती मुलगीही यूपीचीच असते. यातून शेवटी बारामतीची बदनामी होते.
असल्यांचा कायमचा बंदोबस्त करा.रात्री अपरात्री कुठे काही वेडंवाकड करू नका, चुकीचं वागू नका अशा प्रकारचं आव्हान आपल्याला करतो. कुठेही पचापच थुंकू नका, घाण टाकू नका, व्यवस्थित रहा. आणखीन बारामती हिरवीगार करू, त्याला साथ द्या असं आवाहन अजित पवारांनी केलं.
अनधिकृत बॅनरबाजी करणाऱ्यांवर कारवाई करा असे आदेश अजित पवारांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले. ते म्हणाले की, “निकाल संभाजीनगरला होतो, तिथे सार्वजनिक ठिकाणी एक पोस्टर लागत नाही, हायकोर्टाचे आदेश आहेत. इथे अजित पवारचा वाढदिवस असला तर एक जरी पोस्टर लावला तरी काढायचे आणि जप्त करायचे. अजित पवारपासून सुरुवात करा. कोणाचे लाड ठेवू नका. आपले जे ऑथेंटिक बोर्ड आहेत तिथे कोणाला लावायचे आहेत तिथे लावा असं सांगा आपलं शहर विद्रूप करू नका.”
अजित पवार म्हणाले, कोणाच्या भावना दुखव्यात अशी भावना माझ्या मनात कधीच नसते. माझं लहानपण याच शहरात गेलं. अनेक माझे सहकारी याच शहरात लहानाचे मोठे झाले, हे शहर बदलत असताना मी लहानपणी बघितलं आहे.
काही काही ठिकाणी मला कठोर निर्णय घ्यावे लागतात. पिंपरी चिंचवड मध्ये विकास करताना मला अनेकदा अतिक्रमणे काढावी लागली. कोणाच्या पोटावर पाय द्यावा अशी भावना माझी नाही. त्यांची पर्यायी व्यवस्था करायचे आहे, त्याबद्दलचे प्रयत्न चालू आहेत. आपल्या शहरात कायदा सुव्यवस्था सुरक्षित राहावी. त्यात कुणाची दादागिरी, गुंडगिरी असता कामा नये. सर्वांनी शिस्तीचे पालन करावं.
मला कोणीतरी फोटो पाठवले, कोणीतरी अचानक येऊनच इथे ऑफिस काढलं. ही जागा तुमच्या घरची आहे का? ही बारामतीकरांची जागा आहे. असं कसं तुम्ही ऑफिस टाकू शकता? चिप ऑफिसर अधिकारी कसे गप्प बसतात? उद्या अजित पवारच्या उजव्या हातवाल्यांनी जरी ऑफिस टाकलं तरी त्याच्यावर कारवाई करायला अजिबात मागेपुढे बघायचं नाही, असेही अजित पवार यांनी सांगितले.
Ajit Pawar Warns Mischievous Youth”
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला