Ajit Pawar : बारामती निवडणुकीत अजित पवारांचे घोटाळे, संजय राऊत यांचा हल्लाबोल

Ajit Pawar : बारामती निवडणुकीत अजित पवारांचे घोटाळे, संजय राऊत यांचा हल्लाबोल

Ajit Pawar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Ajit Pawar अजित पवारांनी (Ajit Pawar) बारामती निवडणुकीत घोटाळे केले आहेत. त्यांनी पोलिसांच्या गाडीतून पैसे वाटले आहेत. ते संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फक्त नाव घेतात. ते बाबासाहेबांना मानत नाहीत. त्यांनी निवडणुका जिंकण्यासाठी घोटाळेच केलेले आहेत. त्यांची चर्चा महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासोबत होऊ शकते, त्यामुळे ते निवडणूक आयोगाकडे कसे येणार, असा सवाल शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. Ajit Pawar



आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे. या निवडणुका पारदर्शक, निष्पक्ष आणि संविधानाचे पालन करुन व्हाव्यात यासाठी सर्वपक्षीय नेते आग्रही आहेत. राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांचे शिष्टमंडळ येत्या 14 ऑक्टोबर रोजी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार (Ajit Pawar) यांनी सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन संजय राऊत यांनी केले.

http://youtube.com/post/UgkxxCPPEX1Q-rPJi5QXqkqekf4u92PYas7d?si=ZXt9B2JQvxQpGULq

संजय राऊत म्हणाले, अजित पवारांनी (Ajit Pawar) बारामती निवडणुकीत घोटाळे केले आहेत. त्यांनी पोलिसांच्या गाडीतून पैसे वाटले आहेत. रात्रभर बँका उघड्या ठेवल्या होत्या, त्यामुळे तिथे त्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. मतदार वाढवणे आणि वगळणे हा प्रकारही संशयास्पद आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात 60 लाख मतदार कसे वाढले, हा महत्त्वाचा मुद्दा राहाणार आहे, याचीही या वेळी चर्चा होणार आहे. या चर्चेत देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी सहभागी झाले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे. महापालिका प्रभाग आणि वॉर्ड रचना याबद्दल सर्व पक्षाच्या नेत्यांचे आक्षेप आहे. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेत जर हे सर्व पक्ष सहभागी झाले तर संविधान आणि लोकशाही अधिक बळकट होईल. मात्र अजित पवार हे फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतात. बाबासाहेबांचे संविधान मजबूत करण्यासाठी ते काही करत नाहीत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

Ajit Pawar’s scams in Baramati elections, Sanjay Raut’s attack

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023