विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या तोंडून सत्य बाहेर आलेच, आपले वाटोळ झाले आहे हे अजितदादा यांनीच मान्य केले हे उत्तम! फक्त कॅमेरा बंद केल्याने सरकारचे अपयश लपून राहत नाही.” असा टोला काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे. Vijay Vadettiwar
अनेक दिवसांपासून ट्रॅफिक, पावसाचे पाणी आणि वीज खंडामुळे हिंजवडीतील नागरिक त्रस्त झाले होते. शनिवारी अजित पवार यांनी सकाळी 6 वाजताच हिंजवडीत जाऊन आढावा घेतला. पण यावेळी हिंजवडीच्या सरपंचांवर अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. हिंजवडीतील सगळे आयटी पार्क पुणे आणि महाराष्ट्रातून बाहेर चालले आहेत. तुम्हाला काही पडलेले नाही, असे म्हणत अजित पवारांनी सरपंचांची कानउघडणी केली. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांचे आभार मानले आहेत. Vijay Vadettiwar
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून एक पोस्ट केली आहे. त्यांनी या पोस्टमधून अजित पवारांचे आभार मानत म्हटले आहे की, परराज्यात गेलेले उद्योग, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, इन्फ्रास्ट्रक्टरची लागलेली वाट, ट्रॅफिक मॅनेजमेंट नाही, भिकारी झालेले सरकार, मंत्री आणि सत्ताधारी आमदारांचे बेधुंद वागणे हे या राज्याचे वाटोळे होण्यासाठी कारणीभूत आहे आणि हा तुमचाच कारभार आहे! ही सर्व परिस्थिती आणि विकासाचा खोटा ढोल तुम्ही वाजवत आहे. हे सत्य जनतेला पण आता दिसत आहे! महायुतीच्या विकासाचा भकास चेहरा अर्थमंत्री अजितदादांनी समोर आणला यासाठी त्यांचे आभार!
Ajitdada himself admitted that there was a twist, Vijay Vadettiwar’s taunt
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधी दुसरे आंबेडकर होऊ शकतात ! उदित राज यांच्या विधानावरून संताप
- नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी खासदार मुरलीधर मोहोळ थेट जनतेशी थेट संवाद साधणार
- अजित पवार यांच्यावर पूर्ण विश्वास, कोकाटे यांनी फेटाळली राजीनाम्याची चर्चा
- मंत्र्यांचा राजीनामा, संजय शिरसाट म्हणाले सामनामध्ये बातमी आली याचा अर्थ कधीच होणार नाही!