विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर : सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. शंका डोक्यात ठेवू नका. मराठा आरक्षणाचा विषय मी संपवत आणला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा आरक्षणात गेल्यावर काय राहिले? त्यामुळे कुणावरही विश्वास ठेवू नका”, असे आवाहन मराठा आंदाेलक मनाेज जरांगे यांनी केले आहे. Manoj Jarange
छत्रपती संभाजीनगर येथे मनोज जरांगे यांच्यावर उपचार सुरू आहेत.या दरम्यान मराठा आरक्षणाविषयी सुरू असलेल्या चर्चेला त्यांनी उत्तर दिले. मराठा समाजाला आवाहन करताना जरांगे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील सगळे मराठे आरक्षणात जाणार म्हणजे जाणार. यात तिळमात्र शंका नाही ज्यांच्या नोंदी नाहीत म्हणून तर गॅझेट लागू करायचं आहे. त्याचा जीआर निघणे खूप आवश्यक होतं. जो १८८१ पासून काढलेला नाही. एक साधी ओळ सरकारने आजपर्यंत मराठ्यांच्या हिताची लिहिलेली नव्हती.
फक्त संयम आणि शांतता ठेवा. शांत डोक्याने विचार करा. एखाद्या विदूषक आणि अविचारी माणसावर विश्वास ठेवून कधीही संयम, विश्वास ढळू देऊ नका, असे आवाहन करताना जरांगे म्हणाले, सात कोटी जनता आणि मी निर्णय घेतो. निर्णय घेताना मी कधी एकटा घेत नाही. माझी सात कोटी गोरगरीब जनता आणि मी आम्ही दोघं मिळून निर्णय घेतो. त्यामुळेच काही जणांचे पोट दुखत आहे की, आता त्यांच्या हातून सगळं गेलं. त्यांना आरक्षणावरून राजकारण करायचं होतं, गॅझेटवर राजकारण करायचं होतं. त्याच्यावरच ते जगत होते, ते आता पूर्ण कोलमडणार आहेत. Manoj Jarange
जरांगे म्हणाले, हे लोक कधीच आपल्या बाजूने बोललेले नाहीत. मी काय करतोय हे मराठा बांधवांनी समजून घ्या. मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणाशिवाय राहणार नाही, हे पक्क डोक्यात ठेवा आणि आनंदी रहा. कुणाचं ऐकून तुमचं आणि माझं भलं होणार नाही. खूप टोळ्या उठणार आहेत. सरकारच्या बाजूने बोलून नकारात्मकता पसरवायची, कुणाला तरी खूश करायचं. हे समजून घ्या.
ज्यांच्या नोंदी नाहीत, त्यांच्यासाठी गाव पातळीवर आणि तालुका स्तरावर समिती तयार केली आहे. हैदराबादमध्ये असणार्या नोंदी म्हणजे मराठवाड्यातील मराठा हाच कुणबी आहे. याच्यासाठी तिघांची समिती आहे. ज्यांच्याकडे जमीन नाही, त्यांनी बटाईने जमीन केली असेल, त्याचे हमीपत्र देऊन कुणबी प्रमाणपत्र काढता येणार असून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. हैदराबाद गॅझेटच्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा तो जीआर आहे, असेही जरांगे यांनी सांगितले. Manoj Jarange
All Marathas will get reservation, don’t entertain doubts: Manoj Jarange’s appeal
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांनी आम्हाला ज्ञान शिकवू नये, राधाकृष्ण विखे पाटील यांचा टोला
- शरद पवार भेटीला पोचणार म्हटल्याबरोबर मनोज जरांगे ताठ; उर्मट भाषेत फडणवीसांच्या पाठोपाठ राज ठाकरेंवर निशाणा!!
- मनोज जरांगे प्रमाणिक, पण त्याचा वापर, रोहित पवारांकडून रसद, नितेश राणे यांचा आरोप
- स्वतःचं पोरगं निवडणुकीत पाडलं, कधीपर्यंत भाजपची री ओढणार? मनाेज जरांगे यांचा राज ठाकरेंना सवाल