विशेष प्रतिनिधी
पुणे : Nilesh Ghaywal कुख्यात नीलेश घायवळ टोळीवर पुन्हा एकदा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कडक कारवाई करण्यात आली आहे. कोथरूड परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबार आणि धारदार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी १७ जणांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.Nilesh Ghaywal
या टोळीविरुद्ध आधीच अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, या नव्या कारवाईमुळे पोलिसांनी टोळीचे वर्चस्व पूर्णपणे मोडून काढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.कोथरूडमधील एका तरुणावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले होते. या घटनेनंतर पोलिसांनी जलदगतीने तपास सुरू केला आणि काही तासांतच आरोपींना अटक केली.Nilesh Ghaywal
तपासात असे निष्पन्न झाले की, नीलेश घायवळ टोळी गेल्या काही महिन्यांपासून खंडणी, धमकी, आणि हल्ल्याच्या गुन्ह्यांत सक्रिय आहे. या टोळीचे कामकाज संघटित स्वरूपाचे असून, स्थानिक पातळीवर दहशत निर्माण करून आर्थिक फायदा घेणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते.Nilesh Ghaywal
गुंड निलेश घायवळ परदेशात पळून गेला आहे, त्याचा पासपोर्ट देखील रद्द करण्यात आला आहे. युके सरकारला त्याबाबत लिहून त्याचा शोध घ्यावा अशी मागणी पोलिसांनी केली होती, निलेश घायवळ हा लंडनमध्येच आहे. युके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना उत्तर देण्यात आलं आहे. ६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत निलेश घायवळ याचा व्हिसा आहे. निलेश घायवळ हा त्याचा मुलगा लंडनमध्ये शिकत असल्याने तो लंडनमध्ये असल्याची युके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. युके हाय कमिशनने निलेश घायवळबाबत तपास करण्यासाठी स्थानिक पोलिसांना कळवले आहे.
निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारांनी १७ ते १८ सप्टेंबरच्या दरम्यान कोथरुड पोलीस स्टेशनजवळ एका व्यक्तीवर गोळीबार केला होता. त्यानंतर त्यांनी काही अंतरावर एकावरती धारदार शस्त्राने मारहाण केल्याचीही घटना घडली. या दोन घटनांप्रकरणी घायवळ आणि त्याच्या टोळीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपासात पोलिसांनी घायवळ, त्याचा भाऊ आणि इतर साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा नोंदवून कारवाई केली होती.
Another ‘MCOCA’ Slap on Nilesh Ghaywal Gang; 17 Booked in Kothrud Assault Case
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















