विशेष प्रतिनिधी
नागपूर : हनी ट्रॅपमध्ये साधारण 50 मंत्री आणि अधिकारी अडकले:प्रफुल लोढाने किमान 200 कोटींची वसूली केली असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे Vijay Vadettiwar
विजय वडेट्टीवार म्हणाले, हनीट्रॅपचे खूप मोठे रॅकेट आहे. त्यात अनेक मोठे मासे अडकले आहेत. साधारण 50 तरी मंत्री आणि अधिकारी यात अडकले आहेत. हनी ट्रॅपमध्ये मोठे अधिकारी, मंत्री, राजकारणातले अनेक आजी-माजी मंत्री यामध्ये आहेत. ज्यांचे नाव पुढे आले तो लोढा याने अनेकांकडून पैसे घेतले आहेत. त्याने किमान 200 कोटींची वसूली केली असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच तो कोणाचा कार्यकर्ता आहे हे मी बोलणार नाही. पण या सगळ्या प्रकरणाचा खुलासा लवकर होईल. जे झाकलेले चेहरे आहेत ते समोर येतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी गेल्या आठवड्यात विधानसभेत मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनीट्रॅपचे केंडतर असल्याचा आरोप केला होता. तसेच या प्रकरणातील पेनड्राइव्ह देखील त्यांनी सभागृहात दाखवले होते. विधानसभा अध्यक्षांना हनीट्रॅपच्या मुद्द्यावर निवेदन करण्यास सांगितले, पण त्यांच्या सुचनेनंतरही सरकारने निवेदन केले नाही. ना हनी ना ट्रॅप, आमच्यापर्यंत नाना पटोलेंचे बॉम्ब पोहोचलेच नाहीत, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी खिल्ली उडवली होती. आता विजय वडेट्टीवार यांनी देखील हा मुद्दा उपस्थित केला आहे.
सुरज चव्हाणने ज्या छावा कार्यकर्त्याला मारले त्याच्यावर कारवाई करताना पोलिसांना वेळ लागत आहे. सुरज चव्हाणने जे केले त्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री समर्थन करत आहेत, असा याचा अर्थ होतो. अशा प्रकारच्या कृतीला समर्थन आहे का ते मुख्यमंत्र्यांनी सांगावे किंवा सुरज चव्हाणला अटक करावी, अशी मागणी देखील वडेट्टीवार यांनी केली आहे.
या सरकारला थोडी जरी लाज शरम असेल तर माणिकराव कोकाटेंवर कारवाई होईल. शेतकऱ्यांना आणि सरकारला भिकारी म्हणणाऱ्या, सभागृहात रमी खेळणाऱ्या माणसावर कारवाई केली जाईल. माणिकराव कोकाटेंना एक मिनिटही त्या पदावर ठेवू नये अशी आमची मागणी आहे. सरकारला शेतकऱ्यांबाबत प्रेम, कळवळा असेल तर त्यांनी त्वरित कारवाई केली पाहिजे अशीही मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. या सरकारला शेतकऱ्यांच्या भावनांशी देणं घेणं नाही, असे वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्राला पाठीशी घालणार आहे का? रमी खेळणारा मंत्री कृषी मंत्री आहे असं आम्ही सांगू का? असा संतप्त सवाल हि विजय वडेट्टीवार यांनी केलाय. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्त्यव्यावर ते बोलत होते.
Around 50 ministers and officials in honey trap, 200 crores recovered from Praful Lodha : Vijay Vadettiwar
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला