Pune Metro : गणेशोत्सवाच्या आठवड्यात तब्बल 23 लाख पुणेकरांनी केला मेट्रोने प्रवास

Pune Metro : गणेशोत्सवाच्या आठवड्यात तब्बल 23 लाख पुणेकरांनी केला मेट्रोने प्रवास

Pune Metro

विशेष प्रतिनिधि 

पुणे : गणेशोत्सवामुळे केवळ गणपती मंडळातीलच नाही तर पुणे मेट्रो मधील गर्दी देखील झपाट्याने वाढल्याच दिसून आलं आहे. मंडई मेट्रो स्टेशन हे पेठ परिसराच्या जवळ असल्याने अनेक नागरिकांनी मेट्रोने प्रवास करणे पसंत केले आहे. केवळ आठवड्याभरातच तब्बल २२.७५ लोकांनी मेट्रो प्रवास केला आहे. Pune Metro



पिंपरी चिंचवड, रामवाडी आणि जवळच्या उपनगरातील अनेक भाविक वाहतूक कोंडीचा सामना करण्याऐवजी मेट्रोने शहरात येण्यास पसंती दर्शवत आहेत. अनेक नागरिक फुगेवडी, दापोडी, आणि वनाझ सारख्या स्थानकांवर पार्किंग करत पुढील प्रवास हा मेट्रोने करत आहेत.

परिणामी, मंडई, स्वारगेट, शिवाजीनगर आणि कसबा पेठ यांसारख्या स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. ज्यामुळे मंडई हे सर्वाधिक वर्दळ असणारे स्थानक बनले आहे. शहराच्या मध्यभागी सहज पोहोचण्यासाठी मेट्रो अधिकाऱ्यांनी प्रवाशांना शिवाजीनगर आणि कसबा पेठचा वापर करण्याचा देखील सल्ला दिला आहे. Pune Metro

तसेच, लोकांमध्ये कोणत्याही प्रकरचा संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक स्थानकावर मदत कक्ष देखील ठेवण्यात आले आहेत. गणपती दर्शनासाठी कसबा पेठ मेट्रो स्थानकाचा नव्हे तर मंडई मेट्रो स्थानकाचा वापर केला जावा यासाठी जिल्हापेठ तसेच नजदीकच्या स्थानकांवर यासाठी ऑडिओ अनाउन्समेंटचा वापर केला जात आहे.

नियमित दिवसांमध्ये, पुणे मेट्रो दररोज सुमारे २.१ लाख प्रवाशांची नोंद करते. मात्र उत्सवादारम्यान ही सांखी दररोज ३ लाखांच्या पुढे गेल्याच दिसत आहे. गेल्या आठवड्याभरात तब्बल २.७५ लाख लोकांनी मेट्रोने प्रवास केला आहे. ज्यामुळे, ३.१४ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. जो आत्तापर्यंतचा उत्सवाच्या हंगामातील सर्वाधिक आकडा आहे. मेट्रो अधिकाऱ्यांच्या मते, गर्दीच्या वेळी नागरिक मेट्रोचा पर्याय कीती वेगाने स्वीकारत आहे हे यावरून दिसून येते. Pune Metro

मेट्रोमुळे रस्त्यावरील गर्दी कमी झाली, वाहतूक कोंडी देखील कमी झाली तसेच नागरिकांचा प्रवासही अधिक सोयीचा झाला आहे. परिणामी पोलीस यंत्रणेवर येणारा ताणही यामुळे काही अंशी कमी झाला आहे.

As many as 23 lakh residents travelled by Pune Metro during the week of Ganeshotsav

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023