विशेष प्रतिनिधि
पुणे : आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. काल (ता.५) या संदर्भात हरकती नोंदविण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी या प्रभाग रचनेबाबत तब्बल २,८९९ अर्ज दाखल झाले, ज्यामुळे एकूण आकडा हा ५,५०० च्या जवळ गेला. Pune draft ward structure
२२ ऑगस्ट रोजी ही प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. हरकती नोंदविण्यासाठी ४ सप्टेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती. सुरुवातीला हरकती नोंदविण्याचा प्रतिसाद मंद होता. सुरुवातीच्या १० दिवासात केवळ ५८५ अर्ज नोंदविण्यात आले. परंतु, शेवटच्या टप्प्यात या संख्येत झपाट्याने वाढ झाली. आखेर एकूण ५,४९६ हरकती नोंदविल्या गेल्या आहेत.
या प्राप्त झालेल्या एकूण ५,४९६ हरकतींपैकी सर्वात जास्ती हरकती या नऱ्हे-वडगाव बुद्रुक (प्रभाग ३४) येथून आलेल्या आहेत. नऱ्हे-वडगाव मधून एकूण २००० हरकतींची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय सर्वाधिक हरकती विमान नगर-लोहेगाव (प्रभाग ३) आणि मांजरी बुद्रुक-सदेसत्रनाळी (प्रभाग १५) या प्रभागांमधून नोंदविल्या गेल्या आहेत. विमान नगर-लोहेगाव येथून एकूण ८१९ हरकती तर बुद्रुक-सदेसत्रनाळी येथून एकूण ५५८ हरकती नोंदविल्या गेल्या आहेत. Pune draft ward structure
प्रादेशिक पातळीवर, धनकवाडी-सहकारनगर कार्यालयात सर्वाधिक १,९०० आक्षेप नोंदले गेले आहेत. त्यानंतर नगर रोड-वडगावशेरी येतून १,२०० हून अधिक आक्षेप आले आहेत. एकीकडे काही प्रभागांमधून जवळपास हजार ते पाचशे हरकतींची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे, कोथरूड-बावधन आणि वारजे-कर्वेनगर कार्यालयात प्रत्येकी केवळ नऊच आक्षेप दाखल केले गेले आहेत.
काही प्रभागांमधून तर एकाही हरकतीची नोंद न झाल्याचं पाहायला मिळालं. ज्यात शनिवार पेठ-महात्मा फुले मंडई (प्रभाग २५), डेक्कन जिमखाना- हॅप्पी कॉलनी (प्रभाग २९) आणि कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी (प्रभाग ३०) या तीन प्रभागांचा समावेश होतो. यावरून संबंधित प्रभाग रचनेवरून येथील नागरिक समाधानी असल्याचं लक्षात येत. यासोबतच, शेजारच्या मयूर कॉलनी-कोथरूड (प्रभाग ३१) मधून देखील केवळ एकच हरकत नोंदवली गेली आहे. Pune draft ward structure
प्रामुख्याने हरकती कशावर?
नवीन मसूद्यात नद्या, नाले, उड्डाणपूल आणि प्रमुख रस्ते यासारख्या नैसर्गिक आणि प्रशासकीय सीमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल राजकीय कार्यकर्ते आणि नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. अनेक परिसर मनमानीपणे विभागल्या गेल्याचा किंवा इतर वॉर्डांशी जोडले गेल्याचा आरोप् केला जात आहे.
पुणे स्टेशन-जयजवान नगर, येरवडा-गांधीनगर, कमला नेहरू हॉस्पिटल-रास्ता पेठ, आंबेगाव-कात्रज, नऱ्हे-वडगाव बुद्रुक आणि मांजरी बुद्रुक यासारख्या भागातून अशा तक्रारी आल्या आहेत. वॉर्ड सीमांकन हे अव्यवहार्य आणि व्यत्यय आणणारे आहे असा येथील राहिवाशांचा आरोप आहे. Pune draft ward structure
कधी होणार सुनावणी?
२२ ऑगस्ट रोजी प्रभाग रचना जाहीर झाली आणि त्यानंतर ४ सप्टेंबरपर्यंत हरकती स्वीकारण्याची मुदत देण्यात आली. पीएमसीने स्पष्ट केले आहे की या हरकतींवरील सुनावणी ही राज्य सारकरणे नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांकडून ५ ते १२ सप्टेंबर दरम्यान करण्यात येईल. सुनावणी संदर्भात सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल.
As many as 5,500 objections registered against Pune draft ward structure
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा