Ashok Chavan : अशोक चव्हाणांना कॉंग्रेसमध्ये खरंच वनवास झालाय ?

Ashok Chavan : अशोक चव्हाणांना कॉंग्रेसमध्ये खरंच वनवास झालाय ?

Ashok Chavan

विशेष प्रतिनिधी

लातूर : Ashok Chavanमाजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या एका वक्तव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ होत आहे.  “मी आयुष्यातले १४ वर्ष वनवासात होतो. मी यशाच्या शिखरावर होतो, तेव्हा माझ्यावर आरोप झाले, माझं राजकारण संपवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळेच मी कॉंग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला”. असा गौप्यस्फोट करत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यांच्या या स्टेटमेंटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना मोठं उधाण आल आहे. त्यामुळेच कॉंग्रेसमध्ये राहुन अशोक चव्हाणांना असा काय वनवास भोगावा लागला ? याविषयी बोललं जाऊ लागलं. Ashok Chavan

देशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकांचं वारं वाहत असतांना सर्वच राजकीय पक्ष निवडणुकांच्या दृष्टीने आपापल्या परीने मोर्चेबांधणी करत होते. राज्यासह देशात निवडणुकांची जय्यत तयारी सुरु होती. मात्र अशातच अशोक चव्हाणांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि आपल्याला “कुणावरही दोषारोप करायचा नाही, म्हणत विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश करतोय”, असं सांगत जाहीर पक्षप्रवेश केला. त्यांच्या या पक्षप्रवेशाने सगळीकडेच खळबळ माजली होती. Ashok Chavan



खरं तर जेव्हा अशोक चव्हाणांनी कॉंग्रेस सोडून भाजपाची साथ द्यायचा निर्णय घेतला. त्याआधीपासूनच राज्यात अशोक चव्हाणांच्या नाराजीच्या चर्चा रंगत होत्या. मात्र तरी देखील जेव्हा २०२४ च्या फेब्रुवारी महिन्यात अशोक चव्हाणांनी भाजपामध्ये प्रवेश केला, तेव्हा त्यांनी “मला काँग्रेसनं खूप दिलं, तसंच मी देखील पक्षाला खूप दिलं. या दोन्ही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. मात्र आता आपल्याला कुणावरही दोषारोप करायचा नाही, मी फक्त विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश करतोय”. असं वक्तव्य केलं. Ashok Chavan

त्याचबरोबर तेव्हा त्यांनी “मला काँग्रेसमधील कुठल्याही गोष्टीची बाहेर वाच्यता करायची नाही. मला कुणाचीही उणीधुणी काढायची नाहीत. ते माझ्यात स्वभावातच नाही”. असं सांगत पक्ष प्रवेश केला. तेव्हाच त्यांच्या त्या वक्तव्यामधून काहीसा नाराजीचा सूर उमटताना दिसला होता. त्यांचा हा सूर बघता माध्यमांनी तेव्हाच त्यांना नाराजीचं कारण विचारून भांडावून सोडलं होतं. Ashok Chavan

मात्र त्या काळात अशोक चव्हाणांनी पूर्णपणे मौन बाळगलं. त्यांनी पक्षप्रवेशाच्या कारणासाठी केवळ विकासाचा मुद्दा पुढे केला. त्यानंतर लगेचच त्यांना भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारी मिळाली. या सगळ्या घडामोडींना आता एका वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. अशोक चव्हाण भाजपामध्ये चांगले रमले आहेत. मात्र असं सगळं असतानाही, आता पुन्हा एकदा अशोक चव्हाणांना आपल्या जुन्या दिवसांची आठवण आली आणि त्यांनी कॉंग्रेसमधल्या काही कटू आठवणींना नव्याने उजाळा दिला. Ashok Chavan

या सगळ्याला निमित्त मिळालं, ते भाजपाच्या एका मेळाव्याचं. लातूर ग्रामीण मतदारसंघात भाजपाच्या कार्यकर्त्यांचा संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अशोक चव्हाणांनी काँग्रेसवर चांगलीच तोफ डागली आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल भाष्य केलं. यावेळी आदर्श घोटाळ्याचा उल्लेख करत त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील प्रसंग एक मांडला.

चव्हाण म्हणाले की, “२०१० मध्ये माझ्यावर निष्कारण खोटे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे मला मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. २००८ ते २०१० ही कारकीर्द म्हणजे माझ्या राजकीय आयुष्यातला शिखराचा काळ होता. पण कुठलीही चूक न करता मला १४ वर्ष वनवास भोगावा लागला”, असं म्हणत त्यांनी कॉंग्रेसच्या काळात झालेला अन्याय बोलून दाखवला. तसंच यावेळी त्यांनी भाजपाचे गोडवे गात “तिथे आपल्याला मान-सन्मान मिळाला, भाजपाने आपल्याला सन्मानाने पक्षप्रवेश दिला. त्यामुळेच आज आपण खासदार झालो, असं म्हणत समाधान व्यक्त केलं. यावरूनच अशोक चव्हाणांवर नेमका काय अन्याय झाला आहे? असा प्रश्न सगळ्यांना पडू लागला. Ashok Chavan

खरं तर अशोक चव्हाणांना आपल्या वडिलांचा, म्हणजेच शंकरराव चव्हाणांचा राजकीय वारसा लाभलेला आहे. इतकंच नाही तर, वडील आणि मुलगा अशा दोघांनीही राज्याचं मुख्यमंत्रीपद अनुभवलेली राज्यातली ही एकमेव जोडी ठरली. त्यामुळे अर्थातच अशोक चव्हाणांची राजकीय वाटचाल आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत कॉंग्रेसमधूनच सुरु झाली. पुढे त्यांनी महाराष्ट्र युवक काँग्रेसचं उपाध्यक्ष पद, वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी मिळालेली नांदेड लोकसभा मतदारसंघाची खासदारकी, विधानपरिषदेची आमदारकी, प्रदेश काँग्रेस कमिटीचं महासचिव पद, केबिनेट मंत्रीपद आणि राज्याचं मुख्यमंत्रीपद असे एक ना अनेक महत्वाची राजकीय पदं अनुभवली. या सगळ्या पदांमध्ये सर्वात महत्वाचं आणि सर्वोच्च पद म्हणजेच राज्याचं मुख्यमंत्रीपद देखील अनुभवलं.

मात्र २००८ साली, जेव्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत असतानाच त्यांच्या कारकिर्दीला गालबोट लागलं आणि आदर्श घोटाळ्याच्या आरोपांमुळे द्याव्या लागलेल्या राजीनाम्यानंतर त्यांची चांगलीच घसरण सुरु झाली. त्यांना मिळालेलं मुख्यमंत्रीपद अवघ्या दोन वर्षात सोडावं लागलं, आणि त्यांची राजकीय कारकीर्द डागळली. Ashok Chavan

पुढे याच आरोपांमुळे त्यांची राजकीयदृष्ट्या पीछेहाट झाली. खरं तर या संपूर्ण काळात त्यांना कित्येक आरोप प्रत्यारोपांचा सामना करावा लागला. एकंदरीतच त्यांच्या कारकीर्दीवर ताशेरे ओढले गेले. त्यांच्या काळात त्यांच्याच चुकांमुळे निर्माण झालेली काळी बाजू जरी आपण बाजूला ठेवली. तरी प्रश्न पडतो, की ज्या पक्षाने अशोक चव्हांणांना मुख्यमंत्रीपदा इतकं महत्वाचं पद दिलं. वेळोवेळी राज्यात, केंद्रात, आणि पक्षात विविध मानाची पदं दिली. त्या पक्षातील कारकिर्दीला अशोक चव्हाणांनी आजघडीला अशाप्रकारे वनवासाची उपमा देणं कितपत योग्य आहे. कॉंग्रेसने त्यांना बहाल केलेलं मुख्यमंत्रीपद हा त्यांच्यासाठी खरोखरच वनवास होता का ? Ashok Chavan

Has Ashok Chavan really been exiled from the Congress?

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023