Basavaraj Teli आष्टीचा जावई येथे आणून बसविला, एसआयटीचे प्रमुख बसवराज तेलीवर वाल्मीक कराडच्या बायकोचा आरोप

Basavaraj Teli आष्टीचा जावई येथे आणून बसविला, एसआयटीचे प्रमुख बसवराज तेलीवर वाल्मीक कराडच्या बायकोचा आरोप

विशेष प्रतिनिधी

बीड : संतोष देशमुख यांच्या खुनात माझ्या नवऱ्याला अडकवण्याचा डाव आहे , असा आरोप करत वाल्मिक कराडची पत्नी मंजिरी कराड यांनी एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली यांच्या नियुक्तीला आक्षेप घेतला आहे. आष्टीचा जावई येथे आणून बसविला असल्याचा आरोप करत आमदार सुरेश धस यांच्यावरही निशाणा साधला आहे. Basavaraj Teli

मंजिरी कराड म्हणाल्या, एसआयटी प्रमुख बसवराज तेली हे आष्टीचे जावई आहेत. त्यांच्या पत्नी शितल उगले या आयएएस ऑफिसर असून त्या आष्टीच्या राहणाऱ्या आहेत. बसवराज तेली यांच्यासह 8 लोक SIT मध्ये बसवले. त्यांना त्यातून काढा .SIT चे लोक काहीही करून माझ्या नवऱ्याला अडकवू शकतात. उद्या त्यांना बदलले नाही तर रोडवर चक्का जाम करणार आहे. Basavaraj Teli

आमदार सुरेश धस यांच्यावर संशय व्यक्त करताना कराड म्हणाल्या, तेली आणि सुरेश धस यांचे सीडीआर काढा . दोघांचेही सीडीआर काढा अशी आमची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी आहे.Basavaraj Teli

माझ्या नवऱ्यावर चुकीचे गुन्हे दाखल केले तर आम्ही रस्त्यावर उतरू. आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहे. ज्यांचा खून झाला त्याचा आणि माझ्या नवऱ्याचा काहीही संबंध नाही. त्यांचा कधीही संबंध आलेला नाही. तुमच्या राजकारणासाठी माझ्या नवऱ्याचा बळी घेऊ नका. निवडणुकीत माझ्या नवऱ्याने तुमचे काम केले आणि तुम्ही माझ्या नवऱ्याला त्रास देताय. मनमानी पद्धतीने गुन्हे दाखल करत आहेत. मुख्यमंत्री यांना विनंती आहे की हे थांबवा, अशी विनंती त्यांनी केली.

मंजली कराड म्हणाल्या, घटना घडली त्यादिवशी माझे पती परळीत किंवा जिल्ह्यात नव्हते. वंजारी समाजाचे दोन नेते मंत्री झाले म्हणून डोळ्यात खुपू लागले. बजरंग सोनवणे यांनी माझ्या मिस्टरांना जीवे मारण्याची धमकी दिली. वंजारी समाजाची माती करायचे ठरवले आहे. दोन मंत्री झाले हे डोळ्यात खुपतेय. बजरंग सोनवणे यांनी सुरेश धसला मदत केली.

बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातही वाल्मिक कराड प्रमुख संशयित आहे.

सीआयडीने खंडणी प्रकरण व संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिकची चौकशी करण्यासाठी त्याची सीआयडी कोठडी मागितली होती. मात्र, न्यायमूर्तींनी न्यायालयीन कोठडी दिली आहे. खंडणी प्रकरणात त्याची अजून १४ दिवस चौकशी केली जाईल.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड प्रमुख आरोपी असल्याचा दावा विरोधी पक्षांमधील नेते व मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केला आहे. तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने देखील कराडवर आरोप केले आहेत. त्यामुळे कराडवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई केली जावी अशी मागणी विरोधक करत होते. या हत्या प्रकरणात आतापर्यंत इतर आठ आरोपींना अटक करण्यात आली असून सर्वांवर मकोका लावण्यात आला आहे. मात्र, वाल्मिकवर मकोका लावण्यात आला नव्हता. त्याच्यावरही मकोका लावण्यात यावा अशी मागणी होत होती. नागरिकांची ही मागणी आता पूर्ण झाली आहे. वाल्मिक कराडवर आता मकोका लावण्यात आला आहे.

दरम्यान, वाल्मिक कराड याच्या वयोवृद्ध आईनेही परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आपल्या मुलाला सोडावं. तो निर्दोष आहे असं पारुबाई कराड यांचं म्हणणं आहे. त्या 75 वर्षांच्या आहेत. खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडवर अन्याय झालाय असं पारुबाई कराड यांचं म्हणणं आहे. ‘माझ्या मुलाला न्याया द्या’ असं म्हणत त्या परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलनाला बसल्या आहेत.माझ्या लेकाने काही केलं नाही. माझ्या लेकासाठी मी जीव द्यायला तयार आहे. इथून उठणार नाही” असं पारुबाई कराड म्हणाल्या आहेत.

Ashti son-in-law was brought here, SIT chief Basavaraj Teli accused

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023