विशेष प्रतिनिधी
नाशिक : मला अनेक प्रकारचा त्रास झाला आहे, माझ्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, आम्ही मित्र पक्षाचा धर्म पाळतो, मित्रपक्षाच्या नेत्यांनाही शिस्त पाळायला सांगा. भगूरमध्ये तुम्ही काम करू नका असं मला सांगितलं जातं अशी तक्रार आमदार सरोज अहिरे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली आहे.
नाशिक जिल्ह्यातल्या भगूर येथे अजित पवार यांच्या हस्ते पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन झाले. यावेळी शिंदे गटाच्या नेत्यांकडून आपल्याला होत असलेल्या त्रासाची कैफियत त्यांच्यासमोर मांडली. आमदार अहिरे म्हणाल्या, माझी विनंती आहे, दादा मला पण असं चांगलं वाटत नाही की आपल्यासमोर सगळेच हा पाढा वाचतात. पण मलाही त्रास होतो. पण दादा आपल्यालाही माहिती आहे, आपल्याशिवाय कुणाचाही राजकीय वरदहस्त माझ्यावर नाही. मी सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे.
Nilesh Rane : उद्धव ठाकरे यांची पक्ष सांभाळायची कुवत नाही, निलेश राणे यांची टीका
पण अशी काही लोक आहेत, अशी काही अतृप्त आत्मे आहेत. की ज्यांचं समाधान होत नाही. ते जनतेचा पाठिंबा तोडण्याचं काम करत आहेत. दादा देवळाली कॅन्टोन्मेंटसाठी 75 कोटींचा आराखडा पाणीपुरवठा योजनासाठी आपण तयार केलेला आहे. त्याचाही पाठपुरावा आमच्याकडून सुरू आहे.
अहिरे म्हणाल्या, आज आनंदाचा दिवस आहे, कारण सावरकरांच्या जन्मभूमीत राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन केले. आपल्याला दुपारी पत्रकारांनी काही प्रश्न विचारलेत आणि आपण त्याला आपल्या शैलीमध्ये उत्तर दिलेलं आहे. पाणीपुरवठा योजना कशी मंजूर झाली ते सांगते. हे 25 वर्ष सत्तेत होते ते करू शकले नाही. मी काम मंजूर करून आणायचे आणि त्याचे श्रेय घेण्याचे सत्र गेली पाच वर्ष सहन केलं. तुमची लहान बहीण म्हणून तुमचा हात डोक्यावर राहू द्या.
Ask them to follow discipline , MLA Saroj Ahire complains to Ajit Pawar
महत्वाच्या बातम्या
- युवक काँग्रेसचे पुण्यात रास्ता रोको आंदोलन, पोलिसांकडून कार्यकर्ते ताब्यात
- Delhi : दिल्ली रेल्वेस्थानक दुर्घटनेमागे षडयंत्र? ‘विहिंप’ने केली सखोल चौकशीची मागणी!
- Jayalalitha : जयललितांची जप्त मालमत्ता तामिळनाडू सरकारकडे हस्तांतरित करण्याचे आदेश
- Ramdas Athawale धर्मांतर होऊ नये, पण लव्ह जिहाद’ कायद्याला विरोध, रामदास आठवले यांची स्पष्ट भूमिका